‘राम तेरी गंगा मैली’ या १९८५ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटात बोल्ड सीन्स दिल्यामुळे अभिनेत्री मंदाकिनी चर्चेत होती. या चित्रपटाने तिला लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचवले. या चित्रपटातील तिचा साधाभोळा पण, तितकाच मादक अंदाज अनेकांची मनं जिंकून गेला. विशेष म्हणजे या चित्रपटातील मंदाकिनीचं एक गाण प्रचंड गाजलं. मात्र अनेकांनी त्यावर टीकादेखील केली.३० जुलै १९६९ रोजी मंदाकिनीचा जन्म झाला. तिने १९८५ साली अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली. ‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटानंतर तिने जवळपास ६ वर्षे इंडस्ट्रीमध्ये काम केले. पण नंतर अचानक मंदाकिनी गायब झाली. ‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटातील ‘तुझे बुलाएँ ये मेरी’ हे गाणं त्याकाळी प्रचंड गाजलं होतं. या गाण्यामध्ये मंदाकिनीने अनेक बोल्ड सीन दिले असून धबधब्याखाली अंघोळ करतानाचा तिचा व्हिडीओ विशेष गाजला होता. या गाण्यानंतर त्याकाळी बोल्ड सीन देणारी अभिनेत्री म्हणून मंदाकिनीकडे पाहिलं जात होतं. ‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यु करणाऱ्या मंदाकिनीचा आलेख या चित्रपटानंतर प्रचंड उंचावला. मात्र त्यानंतर काही कारणांमुळे तिला चित्रपटसृष्टीतून काढता पाय घ्यावा लागला.चित्रपटांमुळे लोकप्रिय ठरलेल्या मंदाकिनीचं नाव मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी, डॉन दाऊदशीही जोडलं गेलं होतं. दाऊद आणि मंदाकिनीचे प्रेमसंबंध होते अशी चर्चा होती. आम्ही केवळ मित्र आहोत, असं मंदाकिनीने सांगितलं होतं. मात्र दाऊदसोबत नाव जोडले जात असल्याच्या चर्चांना उधाण येताच मंदाकिनी एकाएकी चित्रपटसृष्टीपासून दूर गेली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here