घटस्फोटानंतर अरबाज आणि मलायका आले एकत्र; मलायकाच्या आईने अरबाजला…

0
197

बॉलिवूडमधील सध्याचं लोकप्रिय कपल म्हणजे अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर. ते दोघे सतत एकत्र फिरताना, डिनर डेटला जाताना दिसतात. त्यांचे एकत्र फिरतानाचे फोटो देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्याचे पाहायला मिळते. पण सध्या मलायकाचा पहिला पती अरबाज खानसोबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

बॉलिवूड सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भय्यानीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अरबाज आणि मलायकाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मलायका कुटुंबीयांसोबत बाहेर जेवायला गेल्याचे दिसत होते. अरबाज-मलायकासोबत त्यांचा मुलगा अरहान खान आणि मलायकाची आईदेखील असल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान हॉटेलमधून बाहेर पडल्यावर मलायकाच्या आईने अरबाजला मिठी मारल्याचे दिसत आहे. त्यांच्या या व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.अभिनेत्री मलायका अरोरा आणि अरबाज खान यांनी २०१७ मध्ये घटस्फोट घेतला. १८ वर्षांच्या संसारानंतर ते दोघे विभक्त झाले. घटस्फोटानंतर दोघांनीही वेगळ्या वाटा निवडल्या. एकीकडे अरबाज खान जॉर्जिया अँड्रियानी या मॉडेलला डेट करत आहे तर दुसरीकडे मलायका अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here