मलायका अरोराच्या सौंदर्याचं गुपित?

ताज्या घडामोडी मनोरंजन मुंबई

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आणि त्यांच्या सौंदर्याच्या चर्चा नेहमीच रंगलेल्या दिसतात. त्यांचं रूटिन, त्यांचं ब्युटी सीक्रेट, डाएट या गोष्टी जाणून घेण्यासाठी अनेकजण उत्सुक असतात. अशातट बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराने आपलं ब्युटी सीक्रेट सर्वांसोबत शेअर केलं आहे. मलायकाचं ब्युटी सीक्रेटचा कोणीही अगदी सहज आपल्या डेली रूटीनमध्ये समावेश करू शकतं.

मलायकाने इन्स्टाग्रामवरून या ब्युटी टिप्स आपल्या फॅन्ससोबत शेअर केल्या आहेत. ज्या कोणीही अगदी सहज वापरू शकतं. तिने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलं आहे की, ‘कोण म्हणतं कॉफी शरीरासाठी घातक ठरते, या टिप्सच्या मदतीने तुमच्या व्हिलनचं रुपांतर हिरोमध्ये करा.’

मलायकाने कॉफीच्या योग्य वापराबाबत सांगताना लिहिलं आहे की, ‘बॉडी स्क्रब : उरलेल्या कॉफी ग्राउंडला थोडी ब्राऊन शुगर आणि खोबऱ्याच्या तेलासोबत एकत्र करा. त्वचेवर लावा. हे झटपट होणारं आणि सुगंधी घरगुती स्क्रब आहे. कॉफीमध्ये असलेल्या कॅफेनमध्ये मुबलक प्रमाणात अॅन्टीऑक्सिडंट असतात. जे त्वचेचं सुर्याच्या प्रखर किरणांपासून रक्षण करतात. त्यामुळे त्वचेचं आरोग्य उत्तम राखण्यासही मदत होते.’

काही दिवसांपूर्वी मलायकाने कोरफडीचा योग्य वापर करण्याबाबत सांगितलं होतं. तिचं म्हणणं आहे की, ती स्वतः कोरफड वापरते.

काही दिवसांपूर्वी मलायका अरोरानेही शुटींग सुरु केलं असून तिने यादरम्यान एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मलायका शुटींगदरम्यानच्या काही गोष्टी सांगत आहे.

एवढचं नाहीतर मलायकाने लॉकडाऊननंतर पुन्हा जिम सुरु करण्याचा अनुभवही सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिने इन्स्टाग्रामवर लिहिलं आहे की, ‘जवळपास चार महिन्यांनी काम सुरु करण्यासाठी घारतून बाहेर पडणं. अनेक भावना एकत्र उफाळून आल्या. उत्साह, भीती, आनंद इत्यादी. नक्कीच, गोष्टी आधीसारख्या राहिलेल्या नाहीत. परंतु, शो सुरु राहणं गरजेचं आहे. असं वाटत होतं की, एका मोठ्या सुट्टीनंतर शाळेतील माझा पहिला दिवस आहे आणि मी माझ्या सर्व मित्रमंडळींना भेटण्यासाठी उत्साहित आहे.’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *