मोहोळ नगरपरिषदेची धडक वसुली मोहीमेस प्रारंभ

ताज्या घडामोडी सोलापूर

नागरिकांना थकित कर भरण्याचे आवाहन
मोहोळ, (तालुका प्रतिनिधी): 
मोहोळ नगरपरिषद मार्फत कोरोनाच्या आपत्कालीन परिस्थितीत व लॉक डाउनमुळे थंड झालेल्या वसुली मोहिमेस दि.१५ डिसेंबर पासून वेग देण्यात आला.
मोहोळ नगरपरिषद  मुख्याधिकारी म्हणून जिल्हा प्रशासन अधिकारी पंकज जावळे यांनी पदभार घेताच घरपट्टी,पाणीपट्टी वसुली चा आढावा घेतला व संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना दि. 31 मार्च 2021 पर्यन्त 100%वसुली करणे संबंधीचे आदेश दिले. त्याअनुषंगाने आज मोहोळ नगरपरिषदेचे प्रशासकीय अधिकारी विजयकुमार परबत यांच्या नेतृत्वाखाली दि.15 डिसेंम्बर पासून धडक वसुली मोहीम राबविण्यात आली. यामध्ये शहरातील मोठ्या थकबाकीदारांना वॉरंट बजवण्यात आले. तसेच वॉरंट देऊनही कर न भरणाऱ्या थकबाकीदारांच्या मालमत्ता येत्या 2 दिवसात सील करण्यात येणार आहेत. असे नगरपरिषद मार्फ़त सांगण्यात आले. या वसुली पथकामध्ये नगरपरिषद मधील अधिकारी, कर्मचारी यांची 4 पथके करण्यात आली असून त्यांना दैनंदिन वसुली चे टार्गेट देण्यात आले आहे. तसेच नगरपरिषद मुख्याधिकारी यांनी यावेळी मोहोळ शहरातील नागरिकांना आवाहन केले की, शहरातील प्रत्येक करदात्याने जबाबदारीने आपली घरपट्टी व पाणीपट्टी भरून नगरपरिषदेस सहकार्य करावे, अन्यथा नगरपरिषद मार्फत येत्या काळात नप अधिनियम 1965 मधील कलम 152 ते 155 अन्वये कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. असे मुख्याधिकारी डॉ पंकज जावळे यांनी सांगितले.
या मोहिमेत पथक प्रमुख म्हणून प्रियांका चव्हाण, योगेश खराडकर, राजकुमार सपाटे, सुवर्णा हाके, रोहित कांबळे, अक्षय खटके, अमित लोमटे आदी अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *