…आणि अचानक महिलेच्या शरीरात शिरला 4 फूट लांब साप

ताज्या घडामोडी देशविदेश

मॉस्को : तुम्ही साप घरात शिरताना पाहिला असेल, मात्र कधी साप तोंडात गेल्याचे ऐकले आहे? नाही ना. मात्र रशियाच्या दागेस्तान भागातील लेवशी गावात एक भयंकर प्रकार घडला. येथील एक महिला झोपली असताना अचानक तिच्या शरीरात 4 फूट लांब साप तोंडावाटे शिरला. शरीरात प्रवेश केल्यानंतरही साप गुदमरल्यामुळे त्याचा मृत्यू झाला पण तो गळ्यात अडकला.

डेली मेलच्या वृत्तानुसार , महिलेला जेव्हा हे समजले तेव्हा ती थेट रुग्णालयात गेली. त्या महिलेने डॉक्टरला सांगितले की, शरीरात काही तरी विचित्र घडले आहे. डॉक्टरांनी तिची तपासणी केल्यानंतर त्यांना तिच्या शरीरात साप अडकल्याचे कळले. डॉक्टरांनी या महिलेला भूलीचे इंजेक्शन दिले, आणि हा साप बाहेर काढला. ऑपरेशन सुरू असताना महिलेच्या शरीरात काय आहे, हे डॉक्टरांनाही माहित नव्हते. मात्र त्यांनी सापाला पाहिल्यानंतर तेही हैराण झाले.

डॉक्टरही घाबरले

ही महिला रुग्णालयात आल्यानंतर डॉक्टरांनी तिची तपासणी केली तेव्हा, त्यांनाही माहित नव्हते की महिल्याच्या शरीरात साप आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार हा साप गुदरमरून मेला होता. रुग्णालयातील या विचित्र ऑपरेशनचे फुटेजही दागेस्तानच्या आरोग्य विभागाने प्रसिद्ध केले आहे. दरम्यान यावेळी, अंगणात किंवा मोकळ्या जागेत झोपणे टाळावे आणि मुलांचीही काळजी घ्यावी असे सांगून आरोग्य विभागाने लोकांना आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *