कोव्हिड सेंटरमध्ये धक्कादायक घटना, रुग्णाकडे डॉक्टरनं केली शरीरसुखाची मागणी

ताज्या घडामोडी महाराष्ट्र

औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्यातील एका कोव्हिड सेंटरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कोरोना सेंटरमध्ये डॉक्टराने रुग्णावर बलात्काराचा प्रयत्न (Sexual Harassment of COVID-19 Patient) केल्याची घटना औरंगाबाद शहरातील पदमपुरा याठिकाणी असणाऱ्या कोरोना उपचार केंद्रावर घडली आहे. घटनेनंतर रुग्णांच्या संतप्त नातेवाईकांनी रूग्णालयात घुसून डॉक्‍टरला बेदम मारहाण केली आहे.

या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश मनपा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी दिले आहे. दरम्यान या डॉक्टरला तिथून हटवण्यात आले आहे. असा आरोप करण्यात आला आहे की, संबंधित डॉक्टरने तिचा फोन नंबर मिळवला होता. तो रोज तिला फोन करून त्रास द्यायचा असाही आरोप या महिलेने केला आहे. बुधवारी सुट्टी देण्याच्या नावाखाली या महिलेला केबिन मध्ये बोलावलं आणि या डॉक्टरने शरीरसुखाची मागणी केली. मीडिया अहवालानुसार त्याच्यावर असा आरोप ठेवण्यात आला आहे की, या डॉक्टरने त्या कोव्हिड रुग्ण महिलेला गच्चीवर नेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिने आरडाओरड केल्यानंतर हा सगळा राडा घडला आहे.

दरम्यान या पीडित महिलेने बदनामीपोटी पोलिसात तक्रार दिली नाही. मात्र महापालिका आयुक्तांना तिने घडला प्रकार सांगितला, त्यानंतर त्या डॉक्टरची सेवा संपवण्यात आली आहे. मात्र कोरोना केंद्रावरही आता महिला सुरक्षित नाही ही बाब फारच धक्कादायक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *