महेश भट्ट यांचा लीक झालेला व्हिडीओ खरा आहे का?; गंदी बात फेम अन्वेशीला पडला प्रश्न

मनोरंजन लाइफस्टाइल

गंदी बात फेम अभिनेत्री अन्वेशी जैन सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. सोशल मीडियावर व्हायरल होणार्‍या मादक फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून ती कायम चर्चेत असते. मात्र यावेळी ती बॉलिवूड चित्रपट निर्माता महेश भट्ट यांच्यामुळे चर्चेत आहे. तिने महेश भट्ट यांचा जिया खान सोबतचा एक खासगी व्हिडीओ पोस्ट करुन हे खरं आहे का? असा प्रश्न आपल्या चाहत्यांना विचारला आहे.
अन्वेशीने ट्विट केलेल्या व्हिडीओमध्ये महेश भट्ट आणि जिया खान एकत्र बसून काहीतरी बोलताना दिसत आहे. खरं तर हा एक खासगी व्हिडीओ आहे. मात्र काही दिवसांपूर्वी हा जूना व्हिडीओ सोशल मीडियावर लीक झाला होता. हा व्हायरल होणारा व्हिडीओ खरा आहे का? असा प्रश्न अन्वेशीने विचारला आहे.
अभिनेता सुशांत सिंह राजपुतच्या आत्महत्येमुळे बॉलिवूडमधील घराणेशाहीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यामध्ये सर्वाधिक टीका महेश भट्ट आणि रिया चक्रवर्ती यांच्यावर होतेय. या दोघांनी सुशांतला आत्महत्येसाठी प्रवृत्त केलं असा आरोप काही जणांनी केला आहे. तसंच दोघांचे काही आक्षेपार्ह फोटो देखील सोशल मीडियावर लीक झाले होते. या पार्श्वभूमीवर महेश भट्ट यांचा हा व्हिडीओ सध्या सर्वत्र चर्चेत आहे. काही तासांत शेकडो नेटकर्‍यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *