‘या’ व्यक्तीमुळे झाली माधुरी दीक्षित आणि श्रीराम नेनेंची पहिली भेट

0
97

जेव्हा माधुरी दीक्षितने श्रीराम नेनेंशी लग्न केलं त्यावेळी ती करिअरच्या शिखरावर पोहोचली होती. तिच्या लग्नाच्या बातमीने प्रत्येकजण हैराण झाले होते. माधुरी दीक्षितची श्रीराम नेनेंसोबत झालेली पहिली भेट आणि लग्नानंतरचा प्रवास एका चित्रपटापेक्षा काही कमी नाही. माधुरी आणि श्रीरामची प्रेमकथा कशी सुरू झाली, हे खूप कमी लोकांना माहित आहे. अभिनेत्री माधुरि दीक्षितने त्यांच्या पहिल्या भेटीचा किस्सा शेअर करताना सांगितलं की, तिच्या भावाने अगदी कुणालाही कल्पना न देता दोघांची भेट लॉस एंजेलिसमध्ये करून दिली होती.

अभिनेते अनुपम खेर यांचा टॉक शो ‘द अनुपम खेर शो’ मध्ये बोलताना माधुरी दीक्षितने त्यांच्या पहिल्या भेटीबाबत खुलासा केला. संपूर्ण देश जिला ‘धकधक गर्ल’ नावाने ओळखलं जात होतं, तिने अचानक लग्न करण्याचा निर्णय घेऊन फॅन्सना मोठा झटका दिला. यावेळी बोलताना माधुरी दीक्षित म्हणाली, “ज्यावेळी मी लग्न करण्याचा त्यावेळी मी विचार केला नव्हता की मी माझ्या करियअरच्या शिखरावर पोहोचली आणि लग्न केल्यानंतर माझं काही नुकसान होईल. मी आधीर ठरवलं होतं की जेव्हा केव्हा मी अशा व्यक्तीला भेटेल जो माझा लाइफपार्टनरला भेटेल तेव्हा मी या सगळ्याचा विचार करणार नाही. त्या व्यक्तीसोबत आपलं पुढचं आयुष्य घालवायचा फक्त इतकाच मी विचार केला होता.”

लॉस एंजेलिमध्ये झालेल्या त्यांच्या पहिल्या भेटीबाबत खुलासा करताना माधुरी दीक्षित म्हणाली, “मला माझ्या भावाने एक दिवस तातडीने अमेरिकेला बोलावले. भावाने माझ्याकडे कधीच कोणती मागणी न केल्यामुळे त्याचं हे म्हणणं ऐकून सिनेमातील तारखा अॅडजस्टकरून अमेरिकेला गेली. तिथे भावाने एक पार्टी आयोजित केली होती. श्रीराम नेने ह भाऊ अजित दीक्षितचे खूप जवळचे मित्र आहेत. त्यामुळे भावाने आपल्या पार्टीमध्ये कुणालाही कल्पना न देता श्रीराम नेने यांना त्यांच्या कुटुंबीयांसह आमंत्रित केलं होतं. त्यावेळी श्रीराम नेनेंना मी एक सुपरस्टार आहे याची माहिती नव्हती. मी हिंदी चित्रपटांमध्ये काम करते हे त्यांना माहित नव्हते.” पार्टीमध्ये झालेल्या या पहिल्या भेटीनंतर ते एकमेकांना वेगवेगळ्या कारणांनी भेटत राहिले आणि त्यांचं नात प्रेमात रूपांतरीत झालं. काही काळ एकमेकांना डेट केल्यानंतर अखेर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.जेव्हा माधुरीने अमेरिकन श्रीराम नेनेंशी लग्न केले, तेव्हा तिच्या हातात अनेक नवे प्रोजेक्ट्स होते. अशा परिस्थितीत माधुरी हवाई येथे दहा दिवसांचा हनिमून आटोपून भारतात परतली आणि सर्व प्रोजेक्ट्स पूर्ण केले. त्यानंतर ती आपल्या पतीसमवेत अमेरिकेत स्थायिक झाली. बॉलिवूडला निरोप दिल्याच्या वृत्ताने माधुरीच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला.लग्नानंतर जवळपास 12 वर्षे अमेरिकेत राहिल्यानंतर माधुरीने पुन्हा भारतात परतण्याचा निर्णय घेतला आणि बॉलिवूडमध्ये कमबॅक केलं. माधुरी आणि श्रीराम यांना दोन मुलं आहेत. अमेरिकेच्या प्रसिद्ध डॉक्टरांपैकी एक असलेले डॉ. नेने मुंबईतील एका मनपा रुग्णालयात सेवा देत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here