माढ्यात बेकरी चालकाची निर्घृण हत्या करुन टेम्पो पेटवला

क्राईम सोलापूर

माढा : माढा तालुक्यातील  शिराळ येथील एका व्यक्तीचा अत्यंत क्रुरपणे खून करुन मृतदेह टमटमसह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संजय मारुती काळे (वय 50, रा. शिराळ ता. माढा) असे मृत झालेल्याचे नाव आहे.  संजय काळे हे खारी, टोस्ट बेकरीचा व्यवसाय करत होते. मिळालेल्या माहितीनुसार, संजय काळे हे शनिवारी सायंकाळी जेवण करून घराबाहेरील आपल्या अंगणात झोपले होते.  त्यानंतर मध्यरात्री संजय काले यांनी मालवाहतूक करणारे (एम एच 45-6577) मिनी टॅम्पो  घेऊन, घरी कोणालाही न सांगता घराबाहेर पडले.

दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी  7 वाजता शेवरे (ता. माढा) येथे उजनी कालव्याचा उजव्या बाजूचा रस्त्या लगत टेंभुर्णी – अकलूज रोडजवळ लोकांना एक मालवाहतूक करणारा मिनी टॅम्पो जळालेल्या अवस्थेत आढळून आला.  लोकांनी जवळ जाऊन पाहिले असता संजय काळे यांचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आला. शरीराचे छातीपासून थोडा वरचा भाग शीर आणि एक हात शाबूत होता. बाकी शरीर पूर्णपणे जळून खाक झाले होते. चेहऱ्यावर धारदार शस्ञाने वार केलेल्या खूना डाव्या बाजूचा कान तुटल्यासह जखमा दिसून आल्या.

दरम्यान, मारेकऱ्यांनी काळे यांना ठार करून टेम्पोची स्टेफनी अंगावर टाकत मृतदेह पेटवून दिला असावा अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.  पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला आणि टेंभुर्णी प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी दाखल केला.  खून कोणत्या कारणावरुन झाला हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

मारेकऱ्यांनी मयत संजय काळे याचा खून इतका क्रुरपणे केला आहे की, त्याचे फक्त एक हात आणि चेहराच फक्त ओळखता येत होता. चेहऱ्यावर तीन वार करण्यात आले आहेत. यामध्ये त्याचा एक कान तुटला आहे. तर एक हात मिळून आला नाही तर तोंड धडापासून वेगळे झाले आहे. धडापासून खालचा भाग पूर्ण जळून खाक झाला आहे. हा खून अनैतिक संबधातून झाला असल्याचा संशयही व्यक्त आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *