एन्काऊंटर स्पेशलिस्ट दांडेकरांच्या गाण्यावर ‘तरूणाई फिदा’

ताज्या घडामोडी सोलापूर

इम्रान हाश्‍मीच्या ‘लुट गये’ मध्ये दिसतोय पो.नि.दांडेकरांचा गतकाळ

रोहन नंदाने/सोलापूर
‘लुट गये’ गाणं सध्या धुमाकुळ घालत आहे.ज्या अल्बमला विक्रमी दर्शक वर्ग लाभला आहे.‘लुट गये’ अल्बमवर तरुणाई फिदा असल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे.त्यालाही एक कारण असून मुंबई पोलिस दलातील एन्काऊंटर स्पेशालिस्ट पोलीस निरीक्षक विजय दांडेकर यांचा गतकाळ लपला असल्याची भावना त्यामागे असावी,असे एका पोलिस अधिकार्‍यानं म्हटले.अवघ्या काही दिवसातच ‘लुट गये’ या गीताला 300 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत.    एका सत्य घटनेवर आधारित एक प्रसिद्ध गीत म्हणून पाहिलं जात असून, त्यास लोकप्रियतेचा उच्चांक प्राप्त झाला आहे.जुबिन नौटियाल यांनी हे गीत गायले असून,तनिष्क बागची यांनी संगीतबद्ध केले आहे,तर मनोज मुंताशिर यांनी लिहिले आहे.गाण्याचे दिग्दर्शन राधिका राव आणि विनय सप्रू यांनी केले आहे.ते यूट्यूबवर 3 नंबरवर ट्रेंड होत आहे.इमरान हाश्मीचे वैशिष्ट्य कृत ‘लुट गये’ हे नवीन-नवीन गाणे यूट्यूबवर ट्रेंड होत आहे. ‘लुट गये’ या रोमँटिक गाण्यांच्या सर्व श्रोत्यांकरिता व चाहत्यांना या गाण्याची मेजवानी दिली आहे. इमरान हाश्मीबरोबर अभिनेत्री युक्ती थरेजा देखील मुख्य भूमिकेत आहे.या गीताला ज्या पद्धतीने चित्रीत करण्यात आलं आहे,तो प्रसंग चित्रपट नगरी मुंबईत एका पोलीस अधिकार्‍याच्या जीवनात वास्तवात घडलेल्या प्रसंगाशी मिळता-जुळता आहे.पोलीस निरीक्षक विजय दांडेकर यांच्या खर्‍या कथेने प्रेरित झाले आहे.विजय दांडेकर यांनी आतापर्यंत सर्वात सुप्रसिध्द चकमक विशेषज्ञ असा लौकिक मिळवला.ही माहिती देखील अचूक तारखेसह गाण्याच्या शेवटी या चार्टबस्टर गाण्यात नमूद केली आहे.ती तारीख आहे,16 नोव्हेंबर 1991.त्या दिवशी काही गुंड पो.नि. दांडेकर यांचा पाठलाग करीत असतात.तेव्हा दांडेकर हे स्वतःच्या बचावासाठी मुंबईतील एका हॉटेलच्या खोलीत जातात.त्या खोलीत त्यांची नववधूशी भेट होते,जिचा विवाह तिच्या इच्छेविरुध्द होणार असतो.त्यांच्या त्या भेटीतील भावनांचे रूपांतर पहिल्याच नजरेत प्रेमात होतं.त्यानंतर ती मुलगी पोलीस निरीक्षकासङ्कवेत आपल्या लग्नाच्या ठिकाणी येते.पण त्याच्यासोबत तेथून पळ काढते.ते दोघेही मुंबई पोलिस लायब्ररी विभागात पोहोचतात.त्यावेळी दोघे एकमेकांच्या बंधनात बांधले जातात.जे गुंड पो.नि.दांडेकर यांच्या पाठलाग करीत असतात,ते पोलीस लायब्ररी विभागात देखील पोहोचतात.गुंडांनी झाडलेली गोळी तिला लागते,त्यात ती गंभीर जखमी होऊन गतप्राण होते.त्यानंतर पोलीस निरीक्षक विजय दांडेकर ही आपली गन काढून गुंडांचा खात्मा करतात.इथे हा वास्तव प्रसंग संपतो.मात्र या घटनेनंतर विजय दांडेकर अखेरपर्यंत अविवाहित राहिले,असे म्हटले जाते.

पोलीसही ठेवताहेत रिंगटोन, कॉलर ट्यून
सध्या हे गाणं सोशल मीडियावर प्रचंड गाजत असून पोलिस वर्गातही याची रिंगटोन,कॉलर ट्यून ठेवली जात असल्याचे दिसून येत आहे.संगीत अल्बममध्ये इमरानने पोलीस निरीक्षक विजय दांडेकरची भूमिका साकारली आहे.‘लुट गये’ अल्बमवर तरुणाई तर फिदा झालेली आहेच, त्याचबरोबर पोलीसही रिंग टोन अन् कॉलर ट्यून ठेवत असून ही विजय दांडेकरांना सलामी मानली जात आहे.संजीव भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक,सोलापूर

अन् मी या गाण्याच्या प्रेमातच पडली
प्रेमगीताच्या प्रभावासाठी त्यातील दर्द जितकामहत्वाचा असतो तितकाच त्यामध्ये बेहोश करण्याचा फ्लेवरही हवा. ‘लूट गये’ या गाण्याने तरुणाईला पूर्णपणे घायाळ केले असून, फेसबुक, व्हाट्सअँप, इंस्टाग्राम, रील्स अशा अनेक अप्लिकेशन व सोशल मीडियावर हे गाणं पाहायला मिळत आहे. मी पण या गाण्याची खूप मोठी फॅन झाली असून, दिवसातून मी 15 ते 20 वेळा हे गाणं ऐकते अन् जणू काही मी या गाण्याचा प्रेमातच पडली आहे.

……………………………ज्योती मोरे, सोलापूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *