तरुणींना आवडतात 8 प्रकारचे पुरुष; तुम्ही त्यापैकी एक आहात का?

ताज्या घडामोडी लाइफस्टाइल

आपल्या आवडत्या मुलीला पटवण्यासाठी तुम्ही काय काय करत नसाल, पण मुलींना नेमकी कशी मुलं आवडतात जाणून घ्या.

स्त्रियांना आपलंसं करून घेण्यासाठी किंवा तरुणाईच्या भाषेत सांगायचं तर पटवण्यासाठी पुरुष प्रत्येक मार्गानं प्रयत्न करत असतात. पण सगळेच त्यात यशस्वी होतात असं नाही. मुलींच्या, महिलांच्या मनात नेमकं काय आहे, त्यांना काय हवं आहे हे सहसा ओळखता येत नाही. त्यामुळे महिलांना पुरुषांमध्ये नेमक्या कोणत्या गोष्टी आवडतात, हे शोधून काढण्यासाठी काही प्रयोग आणि संशोधन झालं आहे.

\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\

स्त्री आणि पुरुष यांच्यातल्या परस्परांबद्दलच्या आकर्षणामागचं नेमकं कारण काय, ते शोधण्यासाठी शास्त्रज्ञ बऱ्याच काळापासून संशोधन करत आहेत. ते समजण्यासाठी वेगवेगळे प्रयोगही केले गेले आहेत. पुरुषांच्या नेमक्या कोणत्या गोष्टी महिलांना आकर्षित करतात, याबद्दल विविध संशोधनात काही माहिती मिळाली आहे, ज्याबाबत आज तकनं वृत्त दिलं आहे.

\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\

मिळतंजुळतं व्यक्तिमत्त्व – आपल्याशी मिळतंजुळतं व्यक्तिमत्त्व असेल, तर ते पुरुष आणि स्त्रिया एकमेकांकडे आकर्षित होतात. कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीतल्या काही जणांनी एका ऑनलाइन डेटिंग साइटवरचे 60 पुरुष आणि 60 स्त्रियांचा अभ्यास केला. आपल्याप्रमाणेच दिसायला आकर्षक असणाऱ्या स्त्रिया किंवा पुरुषांकडे पुरुष आणि स्त्रिया आकर्षित झाल्याचं त्यातून दिसलं. आपल्यापेक्षा अधिक सुंदर पार्टनर असेल, तर त्याचं अन्य व्यक्तीसोबत अफेअर जमण्याची भीती असते. तसंच आपल्यापेक्षा कमी सुंदर पार्टनर असेल, तर आपल्याला अधिक चांगला पार्टनर मिळू शकला असता, असं त्यांना वाटतं. ही मानसिकता त्यामागे असते, असं तज्ज्ञांना वाटतं.

\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\

दाढी – पुरुषांना दाढी आहे का आणि असली, तर ती किती मोठी आहे, यावरही स्त्रियांचं पुरुषांकडे आकर्षित होणं अवलंबून असतं. जे पुरुष थोडी दाढी ठेवतात, त्यांच्याकडे स्त्रिया आकर्षित होण्याचं प्रमाण अधिक असतं. कारण त्यात ते अधिक परिपक्व दिसतात. न्यू साउथ वेल्स विद्यापीठात 177 पुरुष आणि  351 महिलांचा अभ्यास करण्यात आला होता. त्यातही थोडी दाढी राखलेल्या पुरुषांकडे आकर्षित झालेल्या महिलांचं प्रमाण अधिक होतं.

\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\

सिक्स पॅक्स नकोत – सिक्स पॅक्स शरीरयष्टीबद्दल बरीच क्रेझ असते. त्याबद्दलची चर्चाही असते; मात्र संशोधनात आढळल्यानुसार पिळदार शरीरयष्टीच्या पुरुषांपेक्षा सर्वसामान्य शरीरयष्टी असलेल्या पुरुषांकडे आकर्षित होणाऱ्या स्त्रियांचं प्रमाण अधिक आहे. कॅलिफोर्निया विद्यापीठात याबद्दलचं एक संशोधन झालं होतं. त्यात 286 महिलांना शर्टलेस पुरुषांची छायाचित्रं दाखवण्यात आली होती. पिळदार शरीरयष्टीच्या पुरुषांना छोट्या कालावधीसाठीचा जोडीदार म्हणून, तर सर्वसामान्य शरीरयष्टीच्या पुरुषांना दीर्घकालीन जोडीदार म्हणून निवडण्याकडे या महिलांचा कल असल्याचं दिसून आलं.

\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\

वय – स्त्रिया स्वतःपेक्षा वयाने मोठ्या असलेल्या पुरुषांकडे आकर्षित होण्याचं प्रमाण अधिक आहे. 2010 मध्ये झालेल्या एका अभ्यासात हे दिसून आलं. विशेष करून ज्या महिला स्वतः कमावणाऱ्या असतात, त्या मोठ्या पुरुषांकडे आकर्षित होण्याचं प्रमाण अधिक असतं. आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असलेल्या महिलांमध्ये स्वतःचा जोडीदार निवडताना आत्मविश्वास असतो. तसंच त्या प्रभावी व्यक्तिमत्त्वाच्या आणि वयाने मोठ्या पुरुषांची निवड करण्याचं प्रमाण अधिक असतं, असं ब्रिटनमधल्या डंडी युनिव्हर्सिटीतल्या प्राध्यापिका आणि लेखिका फह्याना मूर यांचं म्हणणं आहे. 

\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\

सुगंध – टीव्हीवर दाखवल्या जाणाऱ्या डिओडरंटच्या जाहिराती अतिशयोक्तीपूर्ण असतात, हे खरंच; पण स्त्रियांना सुगंध आवडतो आणि चांगला डिओडरंट लावणाऱ्या पुरुषांकडे स्त्रिया आकर्षित होण्याचं प्रमाण अधिक आहे, असं एक अभ्यास सांगतो. ‘इंटरनॅशनल जर्नल ऑफ कॉस्मेटिक सायन्स’मध्ये एका संशोधनाचा अहवाल प्रसिद्ध झाला होता. त्या प्रयोगात काही पुरुषांना सुगंधी, तर काही पुरुषांना गंधहीन स्प्रे देण्यात आला. सुगंधित स्प्रेचा वापर करणारे पुरुष अधिक आकर्षक आणि आत्मविश्वासपूर्ण होते, असं निरीक्षण महिलांनी नोंदवलं. 

\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\

लाल रंग – लाल रंग हा प्रेमाचा म्हणून ओळखला जातो, हे तर सर्वांना माहितीच आहे. व्हॅलेंटाइन्स डेलाही रेड रोझेस देऊनच प्रेम व्यक्त केलं जातं. लाल रंगाचे कपडे घालणारे पुरुष स्त्रियांना अधिक आवडतात, असं एका अभ्यासात आढळून आलं आहे. चीन, इंग्लंड, जर्मनी आणि अमेरिकेत 2010 साली एक अभ्यास झाला होता. त्यात महिलांना लाल रंग आणि अन्य रंगाचे कपडे घातलेल्या पुरुषांचे काही फोटो दाखवण्यात आले होते. लाल रंगाचे शर्ट किंवा टी-शर्ट घातलेले पुरुष अधिक आकर्षक असल्याचं मत बहुतांश स्त्रियांनी व्यक्त केलं होतं.

\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\

सतत हसमुख – अनेक अभ्यासांतून असं आढळलं आहे, की जे पुरुष अधिक हसवतात, त्या पुरुषांकडे स्त्रिया आकर्षित होण्याचं प्रमाण अधिक आहे. विनोदाची चांगली जाणीव असलेल्या पुरुषांसोबत स्त्रियांची लवकर गट्टी जमते आणि त्यांच्यासोबत त्या मनमोकळेपणाने बोलतात

\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\

फ्लर्टिंग – वाचायला थोडं विचित्र वाटेल पण फ्लर्टिंग करणारे पुरुषही महिलांमना आवडतात. आपलं कौतुक केलेलं प्रत्येक स्त्रीला आवडतं. अमेरिकेत रटगर्स युनिव्हर्सिटीत प्राध्यापिका असलेल्या प्रसिद्ध लेखिका हेलेन फिशर यांनी ‘सायकॉलॉजी टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत तेच सांगितलं आहे. आपलं कौतुक करणारे पुरुष बहुतांश स्त्रियांना आवडतात, असं त्यांनी म्हटलं आहे. पुरुषांनी फ्लर्टिंग केलेलं बहुतांश महिलांना आवडतं. आपलं कौतुक ऐकल्यावर त्यांचा चेहरा खुलतो, त्या लाजतात आणि त्या पुरुषाच्या बोलण्याचा गांभीर्याने विचार करायला लागतात, असं फिशर यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *