माझ्या घराचे हफ्ते माझ्याच खात्यातून, सुशांतच्या नाही; अंकिता लोखंडे

ताज्या घडामोडी मनोरंजन

मुंबई : सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात आर्थिक व्यवहाराप्रकरणी अंमलबजावणी संचलनालयही तपास करत आहे. ईडी अधिकृतरित्या तपासाची कोणतीही माहिती दिलेली नाही. पण मीडियामध्ये आलेल्या काही वृत्तात दावा केला जात आहे की, “सुशांत सिंह राजपूत त्याची एक्स गर्लफ्रेण्ड अंकिता लोखंडेच्या एका फ्लॅटचे हफ्ते भरत होता.” मात्र अंकिताने हे वृत्त फेटाळलं आहे.

अंकिता लोखंडेच्या माहितीनुसार, तिने हा फ्लॅट 1.35 कोटी रुपयांमध्ये खरेदी केला होता आणि त्याचे हफ्तेही तिच फेडत आहे. 2010 मध्ये ‘पवित्र रिश्ता’ या टीव्ही मालिकेदरम्यान सुशांत आणि अंकिता यांच्यात जवळीक वाढली. दोघे रिलेशनशिपमध्ये होते. यादरम्यान दोघे लिव्ह इनमध्ये होते आणि याच फ्लॅटमध्ये राहत होते. त्यानंतर सहा वर्षांनी म्हणजेच 2016 मध्ये त्यांचं ब्रेकअप झालं. या फ्लॅटबाबत अंकिताने आता स्पष्टीकरण दिलं आहे.

दस्तऐवजांसह अंकिता स्पष्टीकरण
अंकिताने फ्लॅटचे कागदपत्रे आणि तिच्या खात्यामधून जाणाऱ्या हफ्त्यांची माहिती दिली आहे. अंकिताच्या मते या फ्लॅटचे हफ्ते तिच भरत आहे. या घराची किंमत 1.35 कोटी रुपये आहे. काही वृत्तानुसार, सध्याच्या घडीला या फ्लॅटचा बाजारमूल्य सुमारे 4.5 कोटी रुपये आहे.

अंकिताने एका ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, “मी सगळ्या अटकळ रोखू इच्छिते. मी यापेक्षा पारदर्शी होऊ शकत नाही. इथे मी माझ्या फ्लॅटचं रजिस्ट्रेशन आणि 1 जानेवारी 2019 पासून 1 मार्च 2020 पर्यंतच्या बँक खात्याची सर्व माहिती देत आहे. माझ्याच खात्यामधून प्रत्येक महिन्याला ईमएमआय जातो. मी यापेक्षा जास्त काही बोलू शकत नाही. सुशांतला न्याय मिळावा.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *