इंटरनेटशिवायही पाठवू शकता तुम्ही तुमचं Location; कसं ते पाहा

ताज्या घडामोडी देशविदेश

मुंबई : एखाद्या व्यक्तीला एखादा पत्ता समजावून सांगणं दर वेळीच सोपं असतं असं नाही. मग अशा वेळी आपण त्या व्यक्तीला आपलं लोकेशन पाठवतो. यामध्ये करंट लोकेशन आणि लाइव्ह लोकेशन असे दोन प्रकार असतात. करंट लोकेशन म्हणजे ते शेअरिंग करताना तुम्ही ज्या ठिकाणी असाल, ते ठिकाण शेअर करता येतं. साहजिकच करंट लोकेशन हे स्थिर असतं. लाइव्ह लोकेशन शेअरिंग या प्रकारात तुम्ही शेअर केलेलं लोकेशन तुम्ही जसजसे फिराल त्यानुसार बदलत राहतं. म्हणजे तुम्ही एखाद्या ठिकाणाहून मित्राकडे निघताना लाइव्ह लोकेशन त्याच्याशी शेअर केलंत, तर तुम्ही कुठपर्यंत आलायत हे तो मित्र त्यावरून पाहू शकतो. कारण ते लोकेशन तुम्ही फिराल त्याप्रमाणे अपडेट होत राहील.

पण लोकेशन पाठवायचं म्हटलं म्हणजे त्यासाठी तुमच्याकडे इंटरनेटही हवा असतो. समजा कधीतरी इंटरनेट नसेल तर मग काय? लोकेशन पाठवता येईल का? तर याचं उत्तर आहे हो. इंटरनेटशिवायदेखील तुम्ही तुमचं लोकेशन पाठवू शकता. आता ते कसं? तर याची प्रक्रिया अगदी सोपी आहे. अगदी छोटीशी ट्रिक आणि स्टेप्स तुम्हाला फॉलो कराव्या लागतील.

गुगल मॅपद्वारे लोकेशन पाठवणं

स्मार्टफोनवर इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसताना गुगल मॅप्स (Google Maps) अॅप ओपन करावं. त्यानंतर आपण कुठे आहोत, हे गुगल मॅप्सवर शोधावं. त्यासाठी कॉलनीचं नाव, ब्लॉक किंवा आजूबाजूच्या एखाद्या ओळखीच्या खुणेचा वापर करता येऊ शकतो. उदा. तुम्ही दिल्लीच्या मुखर्जीनगरमध्ये आहात, तर गल्ली क्रमांक किंवा ब्लॉक गुगल मॅप्सवर शोधावा.

गुगल मॅप्सवर तुम्हाला तुमचं लोकेशन नीट सापडलं, की त्यावर काही वेळ टच करून ठेवावं. त्यानंतर त्या लोकेशनवर रेड डॉट तयार होईल आणि फोनच्या स्क्रीनवर खालच्या बाजूला तीन पर्याय दिसतील. पहिला डायरेक्शन, दुसरा शेअर आणि तिसरा सेव्ह. आपल्या आवश्यकतेनुसार योग्य तो पर्याय निवडावा.

एसएमएसने लोकेशन पाठवणं

SMS द्वारे लोकेशन पाठवण्यासाठी RCS सेवा उपलब्ध असते. RCS म्हणजे रिच कम्युनिकेशन सर्व्हिसेस. त्या माध्यमातून तुम्ही एसएमएसद्वारे दुसऱ्या युझरला मल्टिमीडिया कंटेंट, लोकेशन पाठवू शकता. त्यासाठी इंटरनेटची गरज लागत नाही.

व्हॉट्सअपद्वारे लोकेशन पाठवणं

व्हॉट्सअॅप (WhatsApp) हे एक लोकप्रिय अॅप आहे. त्यामुळे लोकांच्या गरजांचा विचार करून त्यात सातत्याने नवनवी फीचर्स येत राहतात. अनेक फीचर्स अशी असतात, की ती आधीच त्यात असूनही अनेकांना त्याबद्दल माहिती नसते. असंच एक फीचर म्हणजे लोकेशन शेअरिंग. (Location Sharing) तुम्ही व्हॉट्सअॅपवरून लोकेशन शेअर करून सहज त्या व्यक्तीला पत्ता समजावून सांगू शकता. एवढंच नव्हे, तर त्यावरून ट्रॅकही करता येतं. व्हॉट्सअॅपद्वारे लोकेशन शेअरिंग कसं करायचं, याबद्दल आता माहिती घेऊ या.

त्यामध्ये

– सगळ्यात आधी व्हॉट्सअॅप ओपन करावं आणि चॅट या ऑप्शनमध्ये जावं.

– त्यानंतर ज्या व्यक्तीला लोकेशन पाठवायचं आहे, त्या व्यक्तीचं नाव सिलेक्ट करून त्याच्याशी पर्सनल चॅट विंडो (Personal Chat Window) ओपन करावी.

– त्यात खाली पेपर क्लिपप्रमाणे दिसणारा अटॅचमेंटचा आयकॉन दिसेल. त्यावर क्लिक करावं.

– त्यात लोकेशन हा पर्याय निवडावा. त्यात Send Your Current Location आणि Share Live Location असे दोन पर्याय दिसतील. त्यातील आपल्याला हवा असलेला पर्याय निवडावा आणि Send बटणावर क्लिक करावं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *