ड्रायव्हिंग लायसन्ससंबंधी लागू होणार नवे नियम

ताज्या घडामोडी देशविदेश

नवी दिल्ली : रस्ते प्रवासादरम्यान चालकाची आणि त्यासोबतच्या लोकांच्या सुरक्षेची काळजी लक्षात घेता, सरकार ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्याच्या प्रक्रियेत बदल करणार आहे. नव्या नियमांतर्गत ड्रायव्हिंग लायसन्स जारी करण्याआधी अर्ज करणाऱ्याला व्हिडीओ ट्युटोरियल दाखवलं जाईल. ड्रायव्हिंग टेस्टच्या एक महिना आधी दाखवल्या जाणाऱ्या या व्हिडीओ ट्युटोरियलमध्ये सेफ ड्रायव्हिंग संबंधी माहिती दिली जाईल. त्याशिवाय, अर्जदाराची दुर्घटना पीडित कुटुंबासोबत चर्चा केली जाईल, जेणेकरुन त्यांना आपल्या आणि इतरांच्या जीवनाचं महत्त्व कळू शकेल.

हा नवा नियम नोव्हेंबर 2021 पासून लागू होणार आहे. नियमांनुसर, जर आधीपासूनच ड्रायव्हिंग लायसन्स आहे आणि एखाद्याने ट्रॅफिक रुल्स तोडल्यास, त्यााला सेफ्टी सर्टिफिकेट कोर्स पास करावा लागेल. हा रिफ्रेशर कोर्स पूर्ण करण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी मिळेल. हा कोर्स पूर्ण केल्यानंतर ड्रायव्हरचं आधार कार्ड ड्रायव्हिंग लायसन्सशी जोडलं जाईल, जेणेकरुन त्या व्यक्तीच्या ड्रायव्हिंगला ट्रॅक केलं जाऊ शकेल.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय आता सेफ-सुरक्षित ड्रायव्हिंगबाबत कठोर नियम करणार आहे. विना हेल्मेट चालकांसाठी मंत्रालयाकडून एक नवं सिस्टम सुरू करण्यात येणार आहे. यात विना हेल्मेट चालकांचा फोटो शेअर केला जाईल आणि त्याचं चालान कापलं जाईल.

केंद्र सरकारने रोड सेफ्टीबाबत जागरुक करण्यासाठी हे नियम केले आहेत. मिळालेल्या आकडेवारीनुसार, 2019 मध्ये रस्ते दुर्घटनांमध्ये जवळपास 44,666 दुचाकी चालकांचा मृत्यू झाला आहे. यात 80 टक्के मृत्यू चालकाने हेल्मेट न घातल्यामुळे झाले आहेत. रिपोर्टनुसार, नव्या ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करण्यांना ऑनलाईन व्हिडीओ ट्युटोरियल आणि ड्रायव्हिंग लायसन्स मिळालेल्या लोकांसाठी सेफ्टी सर्टिफिकेशन कोर्स येणाऱ्या काही दिवसांत नव्या सेंट्रल मोटर व्हिकल नियमांत सामिल केला जाऊ शकतो. दरम्यान, सरकारकडून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *