लतादिदींच्या आयुष्यातल्या पहिल्या गाण्याचं सादरीकरण सोलापुरात, फोटो पाहून त्यांनाही विश्वास बसेना!

ताज्या घडामोडी मनोरंजन सोलापूर

मुंबई : गाणकोकिळा तसंच भारतरत्न लता मंगेशकर या सोशल मीडियावर सक्रिय असतात. आपल्या सोशल मीडियावरुन त्या आपल्या वेगवेगळ्या आठवणींना उजाळा देत असतात. आज देखील त्यांनी एक खास  आठवण आपल्या ट्विटरवरुन शेअर केली आहे. लता मंगेशकर यांनी आपल्या आयुष्यातलं पहिलं क्लासिकल सादरीकरण हे सोलापुरात केलं असल्याचं सांगितलं आहे. तिथला एक खास फोटो देखील त्यांनी ट्वीट केला आहे.  

त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, आज आमच्या ओळखीचे उपेंद्रे चिंचोरे यांचा फोन आला. त्यांनी मला सांगितलं की मी माझा पहिला क्लासिकल परफॉर्मन्स माझ्या वडिलांसोबत 9 सप्टेंबर 1938 रोजी सोलापूर येथे केला होता. हा फोटो त्यावेळी प्रसिद्धी साठी काढला होता. विश्वास बसत नाही की गाणी गाता गाता 83 वर्ष पूर्ण झाली, असं लतादिदींनी म्हटलं आहे.   .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *