मोहोळ पोलीस ठाण्यातील लाचखोर पोलीस नाईक होवाळ अटकेत

क्राईम सोलापूर

मोहोळ,(तालुका प्रतिनिधी): गुन्ह्यात अटक न करण्यासाठी 6 हजार रूपयांची लाच मागितल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलीस नाईक सयाजीराव लक्ष्मण होवाळ (वय 52 रा. सोलापूर) यास लाचलूचपत विभागांच्या पोलिसांनी अटक केली आहे.होवाळ यांना शुक्रवारी न्यायालयात हजर करण्ङ्मात येणार आहे. या कारवाईमुळे मोहोळ पोलीस ठाण्यात खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, दि.16 मार्च 2020 रोजी तक्रारदार व त्यांचा भाऊ,पत्नी,दोन मुले यांचेविरुध्द मोहोळ पोलीस ठाण्यात भादवी 324 अन्वये गुन्हा दाखल होता. हा गुन्हा तपासासाठी पोलीस नाईक होवाळ यांचेकडे होता.दाखल गुन्हयात तक्रारदार यांचे पत्नी व दोन मुलास अटक न करण्यासाठी त्यांना नोटीस देवून सोडून देण्यासाठी तसेच गुन्हयात मदत व पुढे सहकार्य करण्यासाठी सयाजीराव लक्ष्मण होवाळ यांनी तक्रारदार गवळी यांचेकडे 6 हजार रूपये लाचेची मागणी केली.
याबाबत तक्रारदार यांनी लाचलूचपत कार्यालय सोलापूर येथे 16 ङ्कार्च 2020 रोजी  तक्रार  नोंदविली.त्यावरुन आलेल्या तक्रारीची खात्री केल्यानंतर सयाजीराव होवाळ यांच्याकडे गुन्हा तपासावर असल्याचे व गुन्हयात तक्रारदार यांचे पत्नीस व दोन मुलास अटक न करता त्यांना नोटीस देवून सोडून देण्यासाठी 6 हजारांची मागणी करुन तडजोडीअंती 2 जुलै 2020 रोजी 5 हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यास अटक करून मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हि कारवाई पोलीस उप आयुक्त राजेश बनसोडे, अपर पोलीस अधिक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उप अधीक्षक संजीव पाटील, पोलीस निरीक्षक कविता मुसळे,पोलीस शिपाई सोलनकर, स्वामी, पकले, पवार, सन्नके यांनी केली.

मोहोळ मध्ये एकाच महिन्यात दोन कारवाया

मोहोळ तालुक्यामध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्याच्या प्रमाणामध्ये सातत्याने वाढ झालेली दिसून येत आहे. मागील आठवड्यात महावितरण विभागातील अधिकार्‍याला पकडले होते.लाचखोरीमुळे  मोहोळचे नाव सोलापूर जिल्ह्यांत जात आहे. 

ReplyForward

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *