जलसंपदाच्या माजी अधिकाऱ्याला १ कोटीचा गंडा

0
63
सोलापूर : सोलापुरात जलसंपदा विभागाच्या एका माजी अधिकाऱ्याला विम्याची रक्कम आणि पीएसयू बाँडची रक्‍कम मिळवून देण्याचे आमिष दाखवून ९ कोटी १५ लाख ९८ हजार ६८६ रुपयांना फसविण्यात आले. याप्रकरणी भाऊसाहेब काशीनाथ धुमाळ (वय-६३,रा.सावली होर्सिंग सोसायटी,विजापूर रोड) यांनी विजापूर नाका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.त्यानुसार ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.ओ.पी.श्रीवास्तव,राजू टंडन,अमित त्रिपाटी,आशिष मल्होत्रा,राकेश मदान, रामप्रसाद, सुषमा देवभान,नितीन दुबे,चमन अग्रवाल अशी आरोपींची नावे आहेत.याबाबत माहिती अशी की,वरील आरोपींनी गेल्या २७ जानेवारी २०१५ रोजी भाऊसाहेब धुमाळ यांना मोबाईलद्वारे संपर्क साधला.त्यांनी त्यांच्या जागेवर रिलायन्स टॉवर उभारणी करून देतो, विम्याची रक्कम काढून देतो,तसेच पीएसयु बाँडची रक्कम मिळवून देण्याचे आमिष दाखविले. त्यानुसार त्यांच्याकडून अनेकवेळा टप्प्या-टप्प्याने १ कोटी १५ लाख ५८ हजार ६८६ रुपये घेतले. परंतु त्यांनी यापैकी कुठलेही काम केले नाही.याबाबत त्यांच्याकडे पाठपुरावा केला तर त्यांनी निव्वळ उडवाउडवीची उत्तरे दिली.अखेर धुमाळ यांची आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.त्यामुळे त्यांनी आज सर्व आरोपींविरोधात विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here