‘किम जोंग यांनी मला सर्वांसमोर डोळा मारला’, ट्रम्प यांच्या सेक्रेटरीनं केला खुलासा

ताज्या घडामोडी देशविदेश

व्हाइट हाउसच्या माजी प्रेस सेक्रेटरी सारा सॅंडर्सनं नुकताच उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग यांच्याबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. साराने किंम यांनी त्यांच्यासोबत फ्लर्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगत एक मुलाखतीत सर्वांसमोर डोळाही मारल्याचा खुलासा केला आहेसारा सँडर्स यांनी आपल्या नवीन पुस्तकात सांगितले आहे की जून 2018 मध्ये जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सिंगापूर समिटला गेले होते तेव्हा तीसुद्धा त्यांच्याबरोबर होती. साराच्या म्हणण्यानुसार किम जोंग उन यांनी तिला डोळा मारला.

इतकेच नाही तर जेव्हा साराने डोनाल्ड ट्रम्प यांना नंतर याबद्दल सांगितले तेव्हा त्याने याबद्दल विनोदही केला. ट्रम्प हसून म्हणाले की, किम जोंगने तुमच्याशी फ्लर्ट करण्याचा प्रयत्न केला. त्याने तुझ्यावर लाईन मारली! साराच्या म्हणण्यानुसार ट्रम्प बरेच दिवस यावर हसत राहिलेट्रम्प यांनी साराला मजेदार स्वरात सांगितले की, आता आपण आपल्या फायद्यासाठी उत्तर कोरियाला जात आहोत. द गार्डियनच्या अहवालानुसार, सारा सँडर्सचे पुस्तक स्पीकिंग फॉर मायसेल्फ पुढील मंगळवारी प्रसिद्ध होईल. रिपब्लिकन पक्षाशी संबंधित असलेल्या सारा एका मोठ्या कुटुंबाशी संगल्न आहे.

रिपोर्टनुसार, साराने किम जोंग उन यांच्यासह सिंगापूर समिटचा उल्लेख केला आहे. किम जोंग उन आणि ट्रम्प दोघंही महिलांच्या फूटबॉलवर चर्चा करत होते.यावेळीच किम यांनी साराकडून पाहून डोळा मारला. त्यावेळी मला धक्का बसला. मी ताबडतोब खाली पाहिले आणि नोट्स घेत राहिले, असे साराने लिहिले आहेतसेच, साराने लिहिले आहे की किम स्वत:च्या सुरक्षिततेबद्दल खूपच सावध आहेत आणि इतर कोणत्याही नेत्याकडून किंवा व्यक्तींकडून काहीही लगेच स्वीकारत नाहीकिम जोंग-उन यांची भेट घेतल्यानंतर साराने ट्रम्प यांना विमानतळाकडे जात असताना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर ट्रम्प यांनी आश्चर्याने विचारले की त्यांनी तुमच्यासोबत फ्लर्ट केले.सारा यांनी ट्रम्प यांना सांगितले की आपण या सर्व गोष्टी गंमतीदार गोष्टी सांगितल्या नाहीत आणि त्यानंतर त्यांनी ही चर्चा थांबवण्यास सांगितले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *