कियारा आडवाणीची सोशल मीडियावर धूम; नव्या गाण्यामुळे चाहते प्रेमात

ताज्या घडामोडी मनोरंजन मुंबई

मुंबई :धोनी, कबीर सिंह या चित्रपटातून चाहत्यांच्या मनात घर करणारी बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी (Kiara Advani) हिच्या आगामी ‘इंदु की जवानी’ (Indoo Ki Jawani) या चित्रपटाचं पहिलं गाणं ‘हसीना पागल दीवानी’ रिलीज झालं आहे. हे गाणं रिलीज झाल्यानंतर सोशल मीडियावर धम्माल आली आहे. या गाण्यात कियारा आडवाणी धमाकेदार डान्स करीत असताना दिसत आहे. हे गाणं ‘सावन में लग गई आग’ चा रिमेक आहे. या गाण्यासाठी गायक मीका सिंहने (Mika Songh) आवाज दिला आहे.

या गाण्यात निळ्या रंगाचा घागरा घातलेली कियारा नृत्य करीत असताना दिसत आहे. 15 सप्टेंबर रोजी हे गाणं रिलीज करण्यात आलं होतं. या गाण्याला आतापर्यंत 10 लाखांहून जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. कियारा आडवाणीचा सिनेमा ‘इंदु की जवानी’ जूनमध्ये रिलीज होणार होता. मात्र कोरोना व्हायरसच्या महासाथीमुळे सर्व चित्रपटांची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. अनेकांनी तर ओटीटी प्लॅटफॉर्मवरच चित्रपट रिलीज करण्याचा निर्णय घेतला. हा चित्रपटदेखील ओटीटी प्लेटफॉर्म नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *