मंगळवेढा : मंगळवेढा येथील सबजेलमधील 9 कैदयांचे स्वॅब घेण्यात येवून ते कोरोना चाचणीसाठी सोलापूर येथे पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल आज गुरुवारी प्राप्त झाला असून त्यातील 5 कैदी पॉझिटिव्ह तर 2 कैदी निगेटिव्ह आले असून 2 कैदयांचे अहवाल प्रलंबीत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयात सबजेलमधील या पुर्वी रॅपीड अँटीजेन टेस्टमध्ये निगेटिव्ह आलेल्या 9 कैदयांचे स्वॅब घेण्यात आले होते.ते सोलापूर येथे कोरोना चाचणी तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 7 कैदयंाचे कोरोना चाचणी अहवाल दि. 23 रोजी प्राप्त झाले असून त्यातील 5 कैदी पॉझिटिव्ह तर 2 कैदी निगेटिव्ह आले आहेत.उर्वरीत 2 कैदयांचे अहवाल प्रलंबीत आहेत.वरील 5 ही पॉझिटिव्ह कैदी हे विलगीकरण कक्षातील असून त्यांचे निकटतम संपर्कातील हाय रिस्क व लो रिस्क असलेल्या व्यक्तींचे सर्वेक्षणाचे कामकाज आरोग्य विभागामार्फत पूर्ण करण्यात आले असून संबंधितांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.दि.23 जुलै अखेर शहर व ग्रामीण भागात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 68 वर पोहोचली आहे.तर उपचार करून चौघा रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.आजअखेर 63 रुग्ण उपचार घेत आहेत.आत्तापर्यंत शहरातील एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे. कोविड केअर सेंटर व विलगीकरण कक्षातील रुग्णांवर आरोग्य विभाग लक्ष ठेवून आहे.