बहिणीच्या लग्नाला जाण्यासाठी परवानगी मागणाऱ्या पत्नीवर पतीचा हल्ला; चाकूने कापले के

0
137

बहिणीच्या लग्नाला जाण्यासाठी परवानगी मागितल्यावर डॉक्टर पतीने डॉक्टर पत्नीचे चाकूने केस कापल्याची घटना पुण्यात घडली आहे. पत्नीने बहिणीच्या लग्नाला जायचे आहे असे पतीला विचारल्यावर, त्यावरून दोघांमध्ये भांडण झाले होते. त्यानंतर पतीने रागाच्या भरात पत्नीवर हल्ला करत चाकूने तिचे केस कापले आहेत.

कौटुंबिक वादातून डॉक्टर दांपत्यामध्ये हा वाद घडला असल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर पत्नीने पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत आपली तक्रार नोंदवली आहे. रवि दिगंबर धादवड (३८) असे डॉक्टर आरोपी पतीचे नाव आहे तर पल्लवी रवि धादवड असे फिर्यादी पत्नीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धानोरी येथील तिरुपती सोसायटीमध्ये डॉक्टर रवि आणि डॉक्टर पल्लवी हे दांपत्य राहण्यास आहे. रविवारी रात्री पल्लवी यांनी पती रवी यांना बहिणीचे लग्न आहे. त्यासाठी गावी जायचे आहे, असे सांगितले. त्यावरून दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. रवि यांनी पल्लवी यांना मारहाण केली. त्याच दरम्यान रवि यांनी चाकूने पल्लवी यांचे केस कापले. त्यानंतर पाठीवर आणि दंडावर चाकूने हल्ला केला. यामध्ये पल्लवी या जखमी झाल्या आहेत. या घटनेची तक्रार फिर्यादी पल्लवी यांनी दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पती रवि यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास करण्यात येत असल्याचे विश्रांतवाडी पोलिसांकडून सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here