अशी बायको मला हवी! लग्नासाठी मुलगी मिळेना म्हणून पठ्ठ्यानं शहरभर लावले आपले होर्डिंग

ताज्या घडामोडी देशविदेश

तिरुवनंतपुरम : लग्न ठरवायचं  (Marriage Proposal) म्हटलं की एकतर विवाहमंडळात नावनोंदणी केली जाते किंवा ओळखीच्या व्यक्ती लग्न जमवून देतात. सध्या बहुतेक लोक वेबसाईटचा आधार घेतात. वेबसाईटवरच आपला लाइफ पार्टनर शोधतात. मात्र काही जणांनी कितीही प्रयत्न केले तरी त्यांना आपल्याला हवा तसा जोडीदार मिळत नाही. असाच एक केरळमधील (kerala) तरुण ज्याला अद्याप लग्नासाठी परफेक्ट लाइफ पार्टनर मिळाला नाही. मग त्यानं संपूर्ण शहरात आपले होर्डिंग्सच लावून टाकले.

कोट्टयममध्ये राहणारा अनीश सेबस्टियनने संपूर्ण शहरात आपले होर्डिंग्स लावले आहेत. ज्यामध्ये त्याने आपल्याला लग्नासाठी नेमकी कशी मुलगी हवी हे लिहिलं आहे. लग्नासाठी आपल्या काही विशेष मागण्या नाहीत. फक्त आयुष्यात आपल्याला कायम साथ देणारी आणि चांगली मूल्यं जपणारी बायको आपल्याला हवी आहे.

अनीशनं फेसबुकवरदेखील ही पोस्ट केली आहे. होर्डिंगमध्ये त्याने आपला फोटो, मोबाइल नंबर आणि व्हॉट्सअप नंबर आणि ई-मेल आयडीदेखील दिला आहे. ज्या तरुणीला आपल्यासोबत लग्न करायचं आहे, तिनं यावर संपर्क साधावा असं या होर्डिंगमध्ये नमूद करण्यात आलं आहे.अनीश म्हणाला, कोरोना संक्रमण आणि लॉकडाऊनमुळे लोक एकमेकांकडे जाऊ शकत नाही. अशा परिस्थितीत लग्नाच्या मागण्यांसाठी कुणीशी संपर्क होत नाही आहे. आधीच लग्नाचं वय झालं आहे. आणखी उशीर नको म्हणून आपण असं केलं. होर्डिंग लावल्यानंतर चांगल्या मागण्या येऊ लागल्याचंही अनीशनं सांगितल.

परफेक्ट जोडीदारासाठी अशी काहीतरी हटके आयडिया शोधणार अनीश एकटा नाही. तर याआधी यूकेतील एका व्यक्तीने एकटेपणाला कंटाळून स्वतःलाच फेसबुकवर सेल केलं होतं. आपली जाहिरात त्याने दिली. एलन क्लेटॉन (Alan Ian Clayton) असं या व्यक्तीचं नाव आहे. 30 वर्षांचा एलन नॉर्थशायरमध्ये राहतो. गेल्या दहा वर्षांपासून तो डेटिंग अॅप्स वापरतो. मात्र त्याला एकही जोडीदार मिळाला नाही, ज्याच्यासह तो आपलं आयुष्य घालवेल. अखेर एकटेपणाला कंटाळलेल्या एलनने फेसबुकवर आपलीच जाहिरात टाकली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *