कोरोना प्रतिबंधात्मक कारवाईत प्रशासनाचा दुजाभाव …! गरीब व श्रीमंत भेदभाव नागरिकांतून संताप..!

सोलापूर
कुर्डूवाडी : शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेल्या भागात ५०० मीटर चा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून प्रशासनाने निश्चित केला आहे.खबरदारीचा उपाय म्हणून शासनाने दिलेल्या सूचनांनुसार जी खबरदारी घेणे आवश्यक आहे ती प्रशासनातील अधिकारी कर्मचारी यांच्याकडून घेत असताना भेदभाव केला जात असल्याने नागरिकांच्या मधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
 याबाबत जागरूक नागरिकांना याची जाणीव प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांना करून द्यावी लागत आहे. चाचणीत पॉझिटिव्ह निघालेल्या रुग्णाच्या राहत्या घरा समोरीचा रास्ता बंद करण्यास सांगण्यासाठी गेलेल्या नागरिकांना आरोग्य अधिकाऱ्याने पाऊस  पाडल्या मुळे कर्मचारी आले नाहीत त्यामुळे रस्ता उद्या बंद करण्यात येईल असे धक्कादायक उत्तर दिले. यामुळे शासनाच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या भूमिकेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे .
 बडे मिया तो बडे मिया छोटे मिया सुभान अल्ला, नपा कर्मचाऱ्यांच्या बरोबरच वैदकीय अधिकारी याबाबत मागे नाहीत .वैदकीय अधिकाऱ्यांनी स्वायब घेतल्या नंतर तपासणी अहवाल प्राप्त होई पर्यत हाय रिस्क संपर्कातील व्यक्तींना आतापर्यत संस्थानिक विलगिकरन कक्षातच ठेवले आहे.याउलट संस्थानिक विलगिकरन साठी आदिग्रहित केलेले एक मंगल कार्यालय भरले असल्यामुळे घरीच विलगिकरन (होम कोरंटाईन) रहा म्हणून सांगणे म्हणजे हा फार मोठा सावळा गोंधळ आहे.
ही प्रशासनाची दुठ्ठपी भूमिका म्हणजे सर्व सामन्यासाठी कडक लॉक डाऊन शिस्तीचे पालन आणि मोठयनसाठी नियमावलीत शिथिलता तर कायद्यात पळवाटा असाच काही अनुभव शहर वासीयांना काल आला आहे.
अर्था शिवाय कशातच अर्थ नाही म्हणणारणो सुधरा वेळ गेलेली नाही अश्या स्थितीत लोक तुम्हाला देव म्हणू लागलेत थोडी तरी बाळगा अन्यथा कोरोना महामारी पेक्षाही भयानक परिस्थिती निर्माण करण्यासाठी तुम्ही जबाबादर असाल एवढ मात्र नक्की…
    कुर्डूवाडीत न.पा.कडील मुख्याधिकारी यांचा पदाभार रिकामा आहे.या पदावर नूतन मुख्याधिकारी येतील तेव्हा खरे तात्पुरते माढया चे मुख्याधिकारी हे अतिरिक्त म्हणून काम पाहत आहेत.प्रशासनाचा गाडा चालविण्यासाठी एक सक्षम अधिकाऱ्यांची नितांत गरज असते.अन्यथा प्रशासनाचा लगाम हा शासकीय पदाधिकार्या मार्फत तो आप आपल्या सोयीने ताणला जातो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *