म्हणून करीना कपूरला सरोगसीच्या मदतीने व्हायचं होतं आई; सैफ अली खानने केला खुलासा

0
72

करीना कपूर आणि सैफ अली खान यांची जोडी त्यांच्या सिनेमासोबतच खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत राहिली आहे. खास करून आपल्या दोन्ही मुलांमुळे सैफिना अनेकदा चर्चेत आले आहेत. करीना कपूरच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘प्रेग्नेंसी बायबल’ या पुस्तकात करीनाने दोन्ही गरोदरपणातील अनुभवांसोबतच अनेक गोष्टींचा खुलासा केलाय. या पुस्तकातच करीनाने दुसऱ्या मुलाचं नाव जहांगीर ठेवल्याचं जाहीर केलंय. या नावावरून वादही सुरु झाला होता.

करीनाने दोन मुलांना जन्म दिला असला तरी काही सेलिब्रिटींप्रमाणे करीनाला देखील आई होण्याआधी एक चिंता सतावत होती. आई झाल्यानंतर फिगरवर खराब होऊन याचा परिणाम करिअरवर हावू शकतो अशी चिंता करीनाला होती. त्यामुळे सरोगसीचा विचार तिच्या मनात आला होता. नुकत्याच एका मुलाखतीत सैफ अली खानने बॉलिवूडमध्ये पुरुषांपेक्षा महिलांना अधिक आव्हानांचा सामना करावा लागत असल्याचं म्हणत या गोष्टीचा खुलासा केला होता.

या मुलाखतीत सैफ म्हणाला, “जेव्हा मी आणि करीना डेट करत होतो तेव्हा ती झीरो फिगर होती. तिला इंडस्ट्रीमध्ये चांगली कामं मिळतं होती. त्यामुळे प्रेग्नेंसीचा विचार तिच्या मनात आल्यावर ती थोडी चिंतेत असायची कारण याचा परिणाम तिच्या करिअरवर होवू शकला असता.” असं सैफ म्हणाला.तसचं जेव्हा सैफने पहिल्यांना करीनासोबत पहिल्यांदा मुलाचा विषय काढला तेव्हा तिची प्रतिक्रिया थोडी वेगळी होती असं सैफ म्हणाला. सरोगसी करण्याचा तिचा विचार होता असा खुलासा सैफने केला. मात्र काही काळाने करीनाला जाणवलं की आयुष्यात काही गोष्टींमध्ये आपलं १०० टक्के योगदान देणं गरजेचं असतं आणि तिने आई होण्याचा निर्णय घेतल्याचं सैफ म्हणाला.एकमेकांमा डेट केल्यानंतर सैफ आणि करीना २०१२ सालामध्ये लग्न बंधनात अडकले होते.  २०१६ साली करीनाने तैमूरला जन्म दिला तर यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीलाच करीना दुसऱ्यांदा आई झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here