करीनाने ‘या’ चित्रपटात परिधान केले होते तब्बल 130 ड्रेस, केला होता नवा रेकॉर्ड

ताज्या घडामोडी मनोरंजन मुंबई

मुंबई –  बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर एक अष्टपैलू अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आजपर्यंत करीनाने विविध धाटणीच्या भूमिका करून चाहत्यांवर आपली छाप पाडली आहे. करीना नेहमीच आपल्या खास अंदाजामुळे ओळखली जाते. करीनाने बॉलिवूडमध्ये अनेक किताब आपल्या नावावर केले आहेत. मात्र आज आपण अशी एक गोष्ट जाणून घेणार आहोत, जी फारच कमी लोकांना माहिती आहे. करीनाने आपल्या एका चित्रपटात तब्बल 130 विविध ड्रेस घालण्याचा रेकॉर्ड केला आहे. जाणून घेऊया या चित्रपटाबद्दल.

2012 मध्ये करीना कपूर मधुर भांडारकर यांच्या ‘हिरोईन’ या चित्रपटात झळकली होती. या चित्रपटामध्ये करीनाने एका अभिनेत्रीची भूमिका साकारली होती. हा चित्रपट हवा तसा चालला नाही. मात्र यामध्ये करीनाने एक रेकॉर्ड आपल्या नावावर केला होता.

टाइम्स ऑफ इंडियाच्या एका अहवालानुसार ‘हिरोईन’ या चित्रपटात करीनाने तब्बल 130 निरनिराळे ड्रेस घातले होते. आणि हे सर्वच ड्रेस टॉप डिझायनर्स कडून डिझाईन करण्यात आले होते. करीना ही पहिलीच अभिनेत्री होती, जिने एकाच चित्रपटात तब्बल 130 ड्रेस परिधान केले आहेत. यामध्ये करीना खुपचं सुंदर दिसली होती.

‘हिरोईन’ हा चित्रपट एका अभिनेत्रीच्या आयुष्यावर आधारित होता. एखाद्या अभिनेत्रीला यशाची कशी सवय लागते. आणि ज्यावेळी नवीन अभिनेत्री येऊ लागतात तेव्हा तिच्या आयुष्यावर कसा परिणाम होतो. तिचं स्टारडम कसं संपुष्टात येतं.

तसेच तिच्या खाजगी आयुष्यावर त्याचा कसा परिणाम होतो. आणि मग ती काम मिळविण्यासाठी कोण कोणत्या गोष्टी करू शकते. त्यात तिच्या मानसिक स्तिथीवर कसा परिणाम होतो. या सर्व गोष्टी या चित्रपटात विस्ताराने मांडण्यात आल्या आहेत. या चित्रपटात सह कलाकार म्हणून करीना कपूर सोबत अभिनेता अर्जुन रामपालसुद्धा होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *