कंगनाच्या मुंबईतील ऑफिसवर पालिकेचा हातोडा, तोडकाम सुरू

ताज्या घडामोडी महाराष्ट्र

मुंबई : अभिनेत्री कंगना रणौतच्या मुंबईतील ऑफिसवर मुंबई महापालिकेकडून तोडक कारवाईची सुरुवात झाली आहे. कंगना आता मुंबई पालिकेच्या रडारवर आहे. कंगनाच्या मुंबईतील वांद्रे याठिकाणी असणाऱ्या कार्यालयामधील तळमजल्यावर पालिकेच्या तोडकामास सुरुवात झाली आहे. पालिकेची टीम कंगनाच्या मुंबईतील कार्यालयाबाहेर दाखल झाली आहे. याठिकाणी असलेल्या कार्यालयामध्ये बेकायदेशीर बदल झाल्याचा आरोप पालिकेकडून करण्यात आला होता. बेकायदेशील बदलांसाठी पालिकेने मंगळवारी नोटीस देखील बजावली होती. नोटीशीला 24 तास उलटल्यावनंतर पालिकेकडून तोडक कारवाई होत आहे. म्हणजेच याठिकाणी जे कोणते अनधिकृत बांधकाम आहे, त्याच्यावर पालिकेचा हातोडा पडत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *