सराईत गुन्हेगार शिवसेना नगरसेवक लक्ष्मण उर्फ काका जाधव दोन वर्षासाठी स्थानबद्ध

क्राईम सोलापूर

सोलापूर : सावकारी गुन्ह्यात अटक असलेले सोलापुरातील सराईत गुन्हेगार शिवसेना नगरसेवक लक्ष्मण उर्फ काका यल्ल्प्पा जाधव राहणार सेटलमेंट परिसर यांना शहर पोलिसांनी आज एम पी डी ए(MPDA) कायद्यान्वये दोन वर्षासाठी स्थानबद्ध केलं आहे.

सोलापूर शहरातील फौजदार चावडी पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार लक्ष्मण उर्फ काका यलप्पा जाधव, वय ५४ वर्षे रा. सेटलमेंट फ्री कॉलनी क्र.०३, सोलापूर यास एमपीडीए harashtra Prevention of Dangerous Activities अधिनियम, १९८१ अन्वये स्थानबध्द केले आहे.
लक्ष्मण उर्फ काका यलप्पा जाधव याने स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी त्याचे जीवन गुन्हेगारीस वाहून घेवून रामवाडी, न्यु धोंडीबा वस्ती, सेटलमेंट फ्रि कॉलनी क्र.३ व ६, वांगी रोड, बाळे क्रॉस रोड, उमा नगरी, भैया चौक, लक्ष्मी विष्णु चाळ, मॅकनिक चौक, छत्रपती शिवाजी चौक या परिसरात गंभीर स्वरुपाचे गुन्हे करीत आहे.
परिसरातील लोकांना शस्त्राने धमकावून, मारहाण करुन, बेकायदेशीर जमाव जमवुन दंगा करणे, खंडणी मागणे, खुनाचा प्रयत्न करणे, घातक शस्त्राने मारहाण करणे, जुगार खेळणे, आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणे, विनापरवाना सावकारी व्यवसाय करणे, कर्ज वसुलीसाठी त्रास देणे यासारखे गंभीर गुन्हे करत असतो. लक्ष्मण उर्फ काका यलप्पा जाधव हा विनापरवाना बेकायदेशिर सावकारी व्यवसाय करीत आहे. तो या व्यवसायाच्या माध्यमातून त्याच्याकडून व्याजाने पैसे घेतलेल्या कर्जदाराकडून जबरदस्तीने अवास्तव व्याजासह पैसे वसूल करीत असतो. तसेच कर्जदाराने मुदतीत पैसे न दिल्यास मौल्यवान दागिने/पैसे/वस्तु जबरदस्तीने घेतो, संगीकर्जदारास जिवे ठार मारण्याची धमकी सुध्दा देतो. त्यामुळे लोक आत्महत्याचा मार्ग स्वीकारतात. अशा प्रकारची गुन्हेगारी कारवाई करुन लक्ष्मण उर्फ काका यलप्पा जाधव याने परिसरात दहशत र्माण करुन सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण केली आहे. अशा प्रकारे त्याने परिसरात दहशत निर्माण करुन स्वतःस धोकादायक इसम म्हणून सिध्द केले आहे.
लक्ष्मण उर्फ काका यलप्पा जाधव हा सलगर वस्ती पोलीस ठाणेकडील गुंडा रजिस्टरमध्ये नोंद असलेला माहितगार गुन्हेगार असून, त्याचे विरुध्द सन १९९४ पासून आजपर्यंत शहरातील फौजदार चावडी, सलगर वस्ती पोलीस ठाण्यास एकूण ११ गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असल्याच्या नोंदी आहेत. त्यास त्याच्या गुन्हेगारी कारवायापासून परावृत्त करण्यासाठी सन २०१२ मध्ये कलम १०७ फौ.प्र.सं अन्वये प्रतिबंधक कारावाई करण्यात आली होती.लक्ष्मण उर्फ काका यलप्पा जाधव याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही, पुन्हा त्याने सन २०२० मध्ये अलीकडील काळात त्याच्या बेकायदेशिर सावकारी व्यवसायातून स्वत:ची दहशत निर्माण करुन कर्जदारास खंडणी मागून, खुन करण्यास अप्रत्यक्ष कारणीभूत व आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याबद्दल गंभीर स्वरुपाचे गुन्हे केला आहेत. सदर गुन्ह्याच्या तपासात स्थानबध्द इसमास व त्याच्या साथीदारांना अटक केली आहे.
लक्ष्मण उर्फ काका यलप्पा जाधव याचे विरुध्द वेळोवेळी कार्यवाही करुनही त्याच्या गुन्हेगारी वर्तनामध्ये कोणतीच सुधारणा झाली नाही. त्याच्या गुन्हेगारी कृत्यास वेळीच प्रतिबंध करण्यासाठी पोलीस आयुक्त यांनी त्यास एमपीडीए अधिनियम, १९८१ अन्वये स्थानबध्दतेचे आदेश निर्गमित केले आहेत. त्यास आदेशाची बजावणी करुन येरवडा कारागृह, पुणे येथे दाखल करण्यासाठी रवानागी करण्यात आली आहे. लक्ष्मण उर्फ काका यलप्पा जाधव याचा मुलगा विकास उर्फ विकी लक्ष्मण जाधव याच्यावर सुध्दा सलगर वस्ती पोलीस ठाणे येथे अनेक गुन्हे नोंद आहेत. सध्या तो तडीपार असुन सलगर वस्ती पोलीस ठाणे येथील गुरनं ३३१/२०२० क.३८६,५०४,५०६ भादवि, क.१४२ महाराष्ट्र पोलीस अधिनियम यामध्ये अटक आहे. तसेच स्थानबध्द इसमाची पत्नी नामे तिपव्वा उर्फ शारदा लक्ष्मण जाधव हिच्यावर सुध्दा शिराळकोप्पा पोलीस ठाणे, शिवमोगा, कर्नाटक या ठिकाणी अनेक जबरी चोरीचे गुन्हे नोंद आहेत.
शहरात सार्वजनिक सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी मा.पोलीस आयुक्त यांचे आदेशानुसार सर्व पोलीस ठाणे हद्दीतील अवैध व्यवसाय करणारे, सराईत गुंड, समाजविघातक कृत्य करणारे यांची यादी तयार करण्यात आली असून, त्याप्रमाणे कारवाई यापूढेही अशीच चालू राहणार आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *