विराटवर फिदा पाकिस्तानच्या सौंदर्यवती क्रिकेटपटूचा साखरपुडा

क्रीडा ताज्या घडामोडी

इस्लामाबाद :  पाकिस्तानची स्टार खेळाडू कायनात इम्तियाजचा (Kainat Imtiaz Announced Her Engagement) साखरपुडा झाला आहे. पाकिस्तान महिला क्रिकेट संघाची वेगवान गोलंदाज कायनात इम्तियाजने तिच्या साखरपुड्याची माहिती देत चाहत्यांना सुखद धक्का दिला. 28 वर्षीय कायनातने सोशल मीडियावर याबाबतची माहिती दिली. 17 जुलैला कायनताचा साखरपुडा झाला. “अखेर मी होकार दिला”, असं तिने सोशल मीडियावर लिहिलं (Kainat Imtiaz Announced Her Engagement).

कायनात विराटची फॅन

कायनात भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या (Virat Kohli) फलंदाजीची फॅन आहे. 2018 मध्ये कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरोधात एक दिवसीय मालिकेत 558 धावा केल्या होत्या. कोहलीची फलंदाजी पाहून कायनात त्याची फॅन झाली आणि तिने सोशल मीडियावर विराटचं खूप कौतुक केलं होतं. त्यानंतर याची चांगलीच चर्चा झाली होती.

कायनात इम्तियाज ही पाकिस्तानच्या त्या महिला खेळाडूंपैकी आहे ज्या सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असतात. सोशल मीडियावर कायनातने तिच्या साखरपुड्याची माहिती देताच तिला अनेक खेळाडूंनी आणि तिच्या चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *