मुंबई : सध्या आबुधाबी आणि दुबई सॉलिड चर्चेत आहे. कारण, तिथे आयपीएलचा मौसम रंगतोय. कोरोनामुळे यंदा भारतात होणारी आयपीएल दुबईत खेळवली जात आहे. दुबईचं नाव असंही नेहमीच चर्चेत असतं. पण आता लॉकडाऊन मात्र दुबईच्या पथ्यावर पडण्याची लक्षणं दिसू लागली आहेत. कारण क्रिकेटसोबत आता चित्रपटाची शुटिंग्जही दुबईला होताना दिसू लागली आहेत.
दुबई आणि अबुधाबी याचं कलाकारांचं असलेलं कनेक्शन जगजाहीर आहेच. भारतात लॉकडाऊन आणि कोरोनाचं असलेलं सावट लक्षात घेऊन आता दुबईत चित्रकरणं होऊ लागली आहेत. यात नंबर लागला आहे तो कतरिना कैफचा. कतरिना या लॉकडाऊनच्या काळात बऱ्याच दिवसांनी चर्चेत आली आहे. तिचा आगामी सुपरवुमन या कन्सेप्टवर बेतलेला चित्रपट आता तयार होतो आहे. अली अब्बास जफर हे या सिनेमाचे दिग्दर्शक असून त्यांनी यापूर्वीच आपला बाड बिस्तरा दुबईत हालवला आहे. त्यांच्यासोबत चित्रपटाची संपूर्ण टीम दुबईत जाणार आहे. काही मंडळी तिथे पोचलीही आहेत. आवश्यक 20 लोकांचा क्रू यात असेल असं कळतं. जफर बोलताना म्हणाले, दुबईत आम्हाला आवश्यक असलेली जागा मुबलक आहे. शिवाय तिथे सोशल डिस्टन्सिग पासून इतर अनेक गोष्टी आहेत. सिनेमासाठी आम्हाला अशीच जागा हवी होती. त्यामुळे मग चित्रिकरण दुबईत हालवण्यात आलं आहे. ‘