नॅशनल हायवे च्या प्रकल्प संचालकांच्या खुर्चीचा केला सत्कार

ताज्या घडामोडी सोलापूर


शिवसेनेचे संजय कोकाटे यांची गांधीगिरी.

कन्हेरगांव दि प्रतिनिधीटें

भुर्णी शहरातील अंतर्गत रस्त्याचे चौपदरीकरण व सुशोभीकरण करण्याचे काम मंजूर होऊन 26 मार्च रोजी पाच वर्षे पूर्ण झाले , तरीसुद्धा या पाच वर्षात या कामाला सुरुवात झाली नाही . याचा निषेध म्हणून माढा तालुका शिवसेना नेते संजय कोकाटे यांनी शुक्रवारी सकाळी सोलापूर येथील नॅशनल हायवे अथोरिटी ऑफ इंडिया प्रकल्प संचालक कदम यांच्या कार्यालयात जाऊन ते उपस्थित नसल्याने त्यांच्या खुर्चीचा शाल  , फेटा , हार बांधून गांधीगिरी पद्धतीने सत्कार करत आपला निषेध नोंदवला.सोलापूर येथे  टेंभुर्णी शहरातील रस्त्याचे   चौपदरीकरण व सुशोभिकरण करण्याच्या कामाचे  केंद्रीय रस्तेे वाहतू मंत्री नितीन गडकरी  यांनी उदघाटन  करून  पाच वर्ष झाली , परंतु अद्यापपर्यंत कसलेही काम झालेले नाही म्हणून  गांधीगिरी म्हणून  प्रकल्प संचालक नॅशनल हायवे अॅथॉरिटी ऑफ इंडिया  स्वतः हजर नसल्यामुळे त्यांच्या खुर्चीचा सत्कार केला . यावेळी सत्कार करताना रयत क्रांती संघटनेचे सुहास पाटील ,   जाणता राजा मित्रमंडळाचे अध्यक्ष व तत्कालीन सरपंच प्रतिनिधी टेंभुर्णी सुधीर  महाडिक  , बेंबळे चे सरपंच विजय पवार  उपस्थित होते . तसेच पुढील गांधीगिरी प्रमाणे सत्कार  चीफ जनरल मॅनेजर हायवे मुंबई  व त्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन  गडकरी  यांचा सत्कार गांधीगिरी प्रमाणे करण्यात येणार असल्याचे शिवसेना नेते संजय कोकाटे यांनी सांगितले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *