मी येणार, कुणाच्या बापामध्ये हिंमत असेल तर मला अडवा : कंगना

ताज्या घडामोडी देशविदेश मनोरंजन

मुंबई : कंगना रनोट आणि तिने मुंबईबद्दल केलेलं वक्तव्य जोरदार चर्चेत असतानाच आता कंगनाने आणखी एक स्फोटक विधान ट्विटरवर केलं आहे. या वक्तव्याने आता हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

कंगनाने एक ट्विटकरून तिच्या मुंबईवरून चाललेल्या गदारोळाची दखल घेतली आहे. ती घेऊन ती म्हणते, अनेकांनी मी मुंबईत न येण्याची धमकी मला दिली आहे. पण आता मी मुंबईत येणारच आहे. येत्या 9 सप्टेंबरला मी मुंबईत येणार हे नक्की आहे. वेळही मी कळवेन. कुणाच्या बापात हिंमत असेल तर मला त्यांनी रोखून दाखवावं.

कंगना गेल्या काही दिवसांपासून मुंबई पोलिसांवर सातत्याने टिका करते आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर त्याचा तपास योग्य होत नसल्यावरून तिने मुंबई पोलिसांवर टीका केली. त्याची आत्महत्या नसून हत्याच आहे असं सांगतानाच मुंबई पोलिसांवर तिने अनेक गंभीर आरोप केले. मुंबई पोलिसांची आपल्याला सातत्याने भीती वाटत असल्याचं तिने सांगितलं. यावरूनच खासदार संजय राऊत यांनी ज्या लोकांना मुंबईची इतकी भीती वाटते त्यांनी मुंबईत येऊ नये असं विधान केलं

……………………………………..

कंगनाला मुंबईत राहण्याचा कोणताही अधिकार नाही : गृहमंत्री

 बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनोतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केल्यानंतर तिच्यावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. बॉलिवूडपासून राजकारणी आणि सर्वसामान्य तिच्यावर टीकेचे आसूड ओढत आहेत. त्यातच आता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. कंगनाला महाराष्ट्र किंवा मुंबईत राहण्याचा अधिकार नाही, असं अनिल देशमुख म्हणाले.

……………………………………………….

पोकळ धमक्या देत नाही, मी ॲक्शन करणारा माणूस : संजय राऊत

मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत करणाऱ्या कंगना रणौतला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे. मुंबई पोलीस, महाराष्ट्राचा अपमान सहन करणार नाही. मी कोणालाही पोकळ धमक्या देत नाही. मी ॲक्शन करणारा माणूस आहे, असं राऊत म्हणाले.

…………………………………………………..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *