मोहोळमध्ये रंगला “अंदर बाहर” नावाच्या जुगाराचा खेळ… ९ जुगाऱ्यांना मोहोळ पोलिसांनी केले “अंदर”…

क्राईम सोलापूर


मोहोळ :           मोहोळ शहरात रंगलेल्या “अंदर बाहर” जुगार अड्ड्यावर मोहोळ पोलिसांनी छापा टाकून नऊ जुगाऱ्यांना “अंदर” केले. सोमवारी दुपारी दीड वाजता मोहोळ पोलिसांनी पंढरपूर रस्त्यावरील हॉटेल सुखसागर येथे ही कारवाई करून सुमारे ४४ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. या प्रकरणी मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

       बाळू विठ्ठल गायकवाड, सुनिल तुकाराम पवार (रा, नागनाथ गल्ली मोहोळ), आकाश खलीपा पवार (रा. वडर गल्ली मोहोळ), मोहन महादेव चोरमुले (रा. दत्तनगर मोहोळ) नाना लक्ष्मण जाधव, मोहन नजीर काळे, मन्यम नागनाथ जगताप (रा. यावली ता. मोहोळ), बालाजी उत्तम चव्हाण (रा. कोन्हेरी ता. मोहोळ) अनंत नागणकेरी (रा. हॉटेल सुखसागर जवळ मोहोळ) अशी गुन्हा दाखल झालेल्या जुगाऱ्यांची नावे आहेत.          या बाबत मोहोळ पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, मोहोळ शहरातील हॉटेल सुखसागर येथील पत्रा शेड मध्ये जुगार अड्डा सुरू असल्याची गोपनीय माहिती मोहोळ पोलीस प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी सोमवार १० ऑगस्ट रोजी सहायक फौजदार गायकवाड, पोलिस नाईक शरद ढावरे, पो. कॉ. बाळासाहेब दाढे, जगताप, आदलिंगे यांचे पथक कारवाईसाठी रवाना केले. सदर पोलिस पथकाने दुपारी दीड वाजता पंढरपुर रोडवरील हॉटेल सुखसागर येथील पत्राशेड मध्ये सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला.         यावेळी ९ लोक गोलाकार बसून पैशाच्या पैजेवर बावन्न पानांचा “अंदर-बाहर” नावाचा जुगार खेळत असल्याचे आढळले. त्यामुळे पोलिसांनी गराडा घालून त्या सर्वांना ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांनी त्यांच्याकडून १६ हजार ४२० रुपये रोख रक्कमेसह ५ मोबाईल फोन असा मिळूण एकुण ४४ हजार ४२० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. या प्रकरणी मोहोळ पोलिसात वरील नऊ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक फौजदार गायकवाड हे करीत आहेत. मात्र कोरोना महामारीच्या काळात देखील मोहोळ शहरात अवैध धंदे सुरु असल्याचे या घटनेवरुन स्पष्ट झाले असून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *