अभिनेत्री जिया खानच्या मृत्यु प्रकरण : सूरज पंचोली म्हणाला, “आता तरी निकाल लावा”

0
79

बॉलिवूड अभिनेता सूरज पांचोली सतत कुठल्या तरी कारणामुळे चर्चेत असतो. यापैकीच एक कारण म्हणजे अभिनेत्री जिया खान मृत्यू प्रकरणं. सूरज पांचोलीवर अभिनेत्री जिया खान मृत्यू प्रकरणात मुख्य आरोपी असल्याचा आरोप आहे. जिया खाननं ३ जून २०१३ रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. तिच्या आत्महत्येला सुरज पांचोली जबाबदार असल्याचा आरोप जियाच्या आईने केला होता. जिया आणि सूरज यांचे प्रेमसंबंध होते आणि याच प्रेमसंबंधातील वादातून जियाला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप जियाच्या आईने केला होता. बऱ्याच दिवसांपासून हे प्रकरण सुरू असून, या प्रकरणात आता सूरज पांचोली विनंती केली आहे.

जिया खान मृत्यू प्रकरणाला आता एक नवीन वळण मिळालं आहे. ही केस आता सीबीआय न्यायालयाकडे वर्ग करण्यात आली असून, यावर लवकरच निकाल लागेल असं सूरज पांचोलीच म्हणणं आहे. त्याने एका मुलाखतीत त्यांनी ही आशा व्यक्त केली. “आता ही केस सीबीआय कोर्टाकडे दिल्यानं मी निश्चिंत आहे. कारण आता पटकन कारवाई केली जाईल. जर मी दोषी असेन, तर मला शिक्षा होईल नाहीतर मी या सगळ्यातून सुटेनं.”

या प्रकरणी पुढे बोलताना सूरज म्हणाला, “हा काळ माझ्यासाठी कठीण होता. या सगळ्यामुळे लोकांच्या मनात माझ्याबद्दल एक प्रतिमा बनवली गेली. ही प्रतिमा माझ्यासाठी चांगली नव्हती. माझं मलाच माहिती आहे की, मी कसा राहत आहे. मी इतकी वर्षे कशी काढली, याची कुणालाही जाणीव नाही. माझ्या घरच्यांचा सपोर्ट नसता, तर हे कठीण झालं असत. मला सगळं काही विसरून नवीन सुरुवात करायची आहे”, असं सूरजने या मुलाखतीत सांगितलं.

सूरजने २०१५ मध्ये अथिया शेट्टीसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या वर्षाच्या सुरुवातीला तो इसाबेल कैफसोबत ‘टाइम टू डान्स’मध्ये दिसला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here