जेसीबी ऑपरेटरने ट्रॅक्टर चोरुन नेला

0
1
बार्शी  जनसत्य प्रतिनिधी
कोरफळे ता बार्शी येथील ट्रॅक्टर चोरी केल्या प्रकरणी जेसीबी ऑपरेटर अभिजित सुरेश शिंदे रा लोणी ता परांडा याच्या विरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
अधिक माहिती अशी की फिर्यादी समाधान बाळकृष्ण घोगरे रा कोरफळे यांचेकडे  एम एच १३ डी टी ४३६ नंबर चा ट्रॅक्टर आणि ट्रॉली आहे सदर ट्रॅक्टर हा संभाजी तुळशीदास तिकटे यांच्या जेसीबी बरोबर कामाला लावलेला असून ट्रॅक्टरवर गोपाळ तिकटे हे ड्रायव्हर आहेत तर आरोपी अभिजित शिंदे हा जेसीबी ऑपरेटर म्हणून कामाला आहे दि ४ मे रोजी सायंकाळी सात वाजता नेहमीप्रमाणे ट्रॅक्टर संतोष टोणगे यांच्या घराजवळ असलेल्या खुल्या जागेत लावून ड्रायव्हरने चावी दिली रात्री जेवण झाल्यावर फिर्यादी ट्रॅक्टर लावलेल्या ठिकाणी गेला असता त्या ठिकाणी अभिजित शिंदे उभारलेला दिसला म्हणून फिर्यादीने त्यास तू का उभा राहिला आहे असे विचारले त्यावर अभिजित याने काही नाही लघवीला आलो होतो असे सांगितले त्यानंतर फिर्यादी घरी येऊन झोपला व दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता ट्रॅक्टरकडे चक्कर मारायला गेला असता त्या ठिकाणी ट्रॅक्टर दिसला नाही म्हणून घरी येऊन वडिलांना आणि भावांना ट्रॅक्टर बाबतीत विचारले असता त्यांनी काहीही माहिती नसल्याचे सांगितले त्यानंतर संभाजी शिंदे यांना अभिजित कुठे आहे म्हणून विचारले असता त्यांनी तो रात्री साडेअकरा वाजता दारू पिऊन गेला आहे असे सांगितले म्हणून संभाजी शिंदे आणि फिर्यादी अभिजित यांचेकडे गेले आणि ट्रॅक्टरच्या बाबतीत विचारले असता अभिजित चाचपडला यावरून सदर ट्रॅक्टर हा अभिजित शिंदे याने चोरुन नेला असल्याची खात्री झाल्यावर याबाबत तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे याबाबत रीतसर गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस करत आहेत