जामगाव मारहाण; सरपंच पुत्रावर ॲट्रॉसिटी ,माजी उपसरपंचावर गुन्हा दाखल

क्राईम सोलापूर


कामती (प्रतिनिधी) 
मोहोळ तालुक्यातील जामगाव येथील सरपंचाचे पुत्र नामदेव मारुती डांगे यांच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत कामती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तर ग्रामपंचायत शिपाई रामचंद्र ननवरे यांनी माजी उपसरपंच श्रीकांत गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत माहिती अशी की  श्रीकांत मच्छिंद्र गायकवाड रा. जामगाव ता.मोहोळ यांची पत्नी कांचन श्रीकांत गायकवाड या विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत. तारीख २२ रोजी ग्रामपंचायत शिपाई नन्नवरे पाणी पट्टी व घरपट्टी भरण्याची दवंडी देण्यासाठी भीमनगर येथे आले असता श्रीकांत गायकवाड याने आमच्या भीमनगर मध्ये पाणी सोडत नाहीस मग पाणीपट्टी भरा कसे म्हणतोस असे विचारले होते. 
दुसऱ्या दिवशी ता. २३ रोजी सकाळी श्रीकांत गायकवाड हे स्वतःच्या घरासमोर उभे राहिले असता सरपंचाचे पुत्र नामदेव मारुती डांगे यांनी तू काल ग्रामपंचायत शिपायास काय म्हणलास, तुला माज आला आहे का? तुला मी बघतो असे म्हणून निघून गेला. तेंव्हा घडला प्रकार मी सरपंच यांच्या कानावर घालण्यासाठी सायंकाळी गावचे सरपंच मारुती श्रीकांत डांगे व आरोपीचा मामा संजय धोंडीबा हाके यांच्याकडे जाऊन  सांगत असताना नामदेव मारुती डांगे हा तेथे आला व त्याने माझ्या शर्टची गच्ची धरून तुझी काय लायकी आहे असे म्हणून जातीवाचक शिवीगाळ करून हातातील लोखंडी रॉडने मारहाण करून जखमी केले. त्यावेळी माझ्या गळ्यातील सोन्याची साखळी तुटून गहाळ झाली आहे. अशा आशयाची फिर्याद कामती पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. 
तर ग्रामपंचायत शिपाई रामचंद्र ननवरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते दिनांक २३ रोजी सकाळी नऊच्या सुमारास गावातील नामदेव मारुती डांगे अशी मिळून प्रधानमंत्री घरकुल आवास योजना यादी घेऊन गावातील लाभार्थ्यांना माहिती देण्यासाठी सरकारी कामासाठी गेले असता गावांमध्ये दवंडी देत हरिजन वस्तीमध्ये समाज मंदिराजवळ गेले त्यावेळी गावातील श्रीकांत मच्छिंद्र गायकवाड यांनी जवळ येऊन तुम्ही कसली दवडी देता तुमचा काय संबंध असे म्हणून शिवीगाळ केली त्यावेळी नामदेव डांगे  त्यांना समजावून सांगितले त्यावेळी श्रीकांत गायकवाड यांनी माझ्या हातातील प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेचे सरकारी यादी घेऊन फाडून टाकली. नामदेव डांगे यांनी भांडण सोडवा सोडवा करीत असताना त्यांना शिवीगाळ करून डांगे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून अंगावरील कपडे फाडले अशी तक्रार ग्रामपंचायत शिपाई यांनी कामती पोलीस स्टेशन येथे दाखल केली आहे याविषयीचा अधिक तपास पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण उंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.का. यशवंत कोटमळे व संतोष माने हे करत आहेत.
तर अॅट्रॉसिटी अंतर्गत अ.जा.अ.ज. ३ (२), ३(१)(४), ३(१)(५), ३२३,३२४ कलमान्वये दाखल झालेल्या सदर घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी प्रभाकर शिंदे हे करत आहेत.Attachments area

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *