जामगाव खुर्द येथे मका पिक पाहणी कार्यक्रम , गंगा-कावेरी यांच्यातर्फे शेतकरी मेळावा

ताज्या घडामोडी सोलापूर

गंगा-कावेरी प्रा.लि. हैद्राबाद यांच्यातर्फे शेतकरी मेळावा

कामती प्रतिनिधी 
जामगाव खु येथे गंगा-कावेरी प्रा.लि. हैद्राबाद यांच्यातर्फे शेतकरी मेळावा आयोजित केला होता. श्री अर्जुन हाके रा. जामगाव खुर्द यांच्या शेतात घेण्यात आलेल्या गंगा कावेरी मका उत्पादन, पीक पाहणी कार्यक्रम अंतर्गत दाखविणेत आले. सदर कार्यक्रमासाठी गंगाधर कल्याणकर गंगा-कावेरी प्रा.लि. हैद्राबाद प्रतिनिधी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
कंपनीचे नागेश कोकरे यांनी गंगा कावेरी बियानाबद्दल माहिती सांगत असताना राज्य सरकार व केंद्र सरकार देखील शेतकरी यांचे उत्पादन दुप्पट व्हावे यासाठी विविध उपाययोजना राबवत असल्याचे सांगून त्याचाच एक भाग म्हणून शेतकरी यांनी विविध पिकांची लागवड करताना चांगल्या बियाणांचा वापर करण्यात यावा व पीक वाढीबाबत योग्य ती काळजी घेतली तर उत्पन्न दुप्पट होण्याला चालना मिळेल असे सांगितले. ग्रामीण भागातील शेतकरी यांनी आता चांगल्या बियाणांचा वापर करून व आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेतीत सुधारणा केली तर उत्पादन वाढण्यास मदत होईल असे सांगितले.  
आम्ही गंगा कावेरी बियाणांचा वापर केल्यामुळे व वेळोवेळी आम्ही योग्य ती काळजी घेतल्यामुळे आम्हाला एकरी ३० ते ४० क्विंटल मका उतपन्न मिळण्याची अपेक्षा असल्याचे मका बागायतदार श्री रामांना हाके यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले.
 या मेळाव्यासाठी या सरपंच मौला आत्तार, उपसरपंच नारायण फडतरे, पोलीस पाटील दत्तात्रय फडतरे, अण्णा कदम ,  महादेव मळगे, नागनाथ पाटील,भागवत साठे, पीरप्पा हाके, महादेव सलगर, दादा सलगर, चंद्रकांत फडतरे, यल्लप्पा हाके, कृष्णदेव हाके, सोमलिंग हाके, बनसिद्ध हाके,  रंगनाथ हाके, भीमराव हाके, राहुल फडतरे श्रीकांत साठे , तुकाराम साठे , महादेव साठे , लक्ष्मण फडतरे  सह जामगाव बुद्रुक व खुर्द व कोरवली येथील शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. सदर कार्यक्रमासाठी नागेश साठे यांनी नियोजन केले. गंगाधर कल्याणकर यांनी कार्यक्रमाची सांगता केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *