फेस्टिव्ह सीझनमध्ये ‘या’ कारवर जाहीर झाला 60,000 रुपयांपर्यंतचा बंपर डिस्काउंट

ताज्या घडामोडी देशविदेश

नवी दिल्ली : भारतात फेस्टिव्ह सीजन तोंडावर असताना, ऑटोमोबाईल कंपन्यांकडून ग्राहकांसाठी नवीन ऑफर्स लॉन्च करण्यात येत आहेत. साऊथ कोरियन ऑटोमेकर Hyundaiने आपल्या काही ठराविक मॉडेलवर ग्राहकांसाठी स्पेशल ऑफर जारी केली आहे. कंपनी सहा मॉडेलवर 60000 रुपयांपर्यंतची सूट देत आहे.

Hyundai Aura

Hyundai Aura ही कंपनीच्या नव्या मॉडेलपैकी एक आहे. Hyundai Aura खरेदी करण्याचा विचार करत असल्यास या गाडीवर कंपनी 25 हजार रुपयांपर्यंतची आकर्षक ऑफर देत आहे.

Hyundai Grand i10 Nios

Hyundai Grand i10 Nios ही कार फोर्डच्या फीगो आणि मारुती सुझुकीच्या स्विफ्टला टक्कर देते. हे मॉडेल कंपनीच्या सक्सेसर मॉडेलपैकी एक आहे. कंपनी या कारवरही ग्राहकांना 25 हजार रुपयांपर्यंतचा डिस्काऊंट देत आहे.

Hyundai Santro

कंपनीचं हे मॉडेल बजेट हॅचबॅक कारपैकी एक आहे. या कारच्या खरेदीवर ग्राहकांना 45 हजार रुपयांपर्यंतचा फायदा होऊ शकतो. कंपनीचं हे सर्वाधिक विक्री होणारं मॉडेल आहे.

Hyundai Grand i10

Hyundai च्या अतिशय फेमस कारपैकी हे एक मॉडेल आहे. कंपनीने 2013 मध्ये i10ला रिप्लेस करत पॉवरफुल मॉडेल Grand i10 बाजारात लॉन्च केलं होतं. या कारच्या खरेदीवर 60 हजार रुपयांची बंप्पर सूट मिळू शकते.

Hyundai i20

कंपनीने आपल्या या मॉडेलला आणखी पॉवरफुल करण्यासाठी BS6 इंजिनसह बाजारात आणलं होतं. या अपग्रेडनंतर हे मॉडेल केवळ पेट्रोल इंजिनमध्येच उपलब्ध आहे. ही कार ऑफरमध्ये 60 हजारांच्या सूटसह खरेदी करता येऊ शकते.

या ऑफर्समध्ये कारचं मॉडेल, डीलरशीप, कलर आणि शहराच्या आधारे वेगवेगळे नियम असू शकतात. अधिक माहितीसाठी कंपनीच्या डीलरशीपकडे संपर्क करणं आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *