बारावीचा निकाल: विद्यार्थिनींची बाजी; निकाल विद्यार्थ्यांपेक्षा जास्त

0
54

राज्य मंडळाने बारावीचा निकाल जाहीर केला आहे. राज्याचा यंदाचा निकाल हा ९९.६३ टक्के लागला आहे. दरवर्षी प्रमाणेच यावर्षीही मुलींनी निकालात बाजी मारली आहे. सर्व विभागिय मंडळातून विद्यार्थिनींचा निकाल ९९.७३ टक्के असून विद्यार्थ्यांचा निकाल ९९.५४ टक्के आहे. विद्यार्थिनींच्या निकालाची टक्केवारी विद्यार्थ्यांपेक्षा ०.१९ टक्क्यांनी जास्त आहे.

दरम्यान, विद्यार्थ्यांना दुपारी चार वाजता ऑनलाइन निकाल पाहता येणार आहे. यावर्षी सर्वाधिक ९९.८१ टक्के निकाल कोकण विभागाचा आणि सर्वात कमी ९९.३४ टक्के निकाल औरंगाबाद विभागाचा लागला आहे. तर, १६० पैकी ७० विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळातून विज्ञान, कला, वाणिज्यव एचएससी व्होकेशनल या शाखांतील एकूण १३ लाख १९ हजार ७५४ विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली होती. त्यापैकी १३ लाख १४ हजार ९६५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी ९९.६३ टक्के आहे.

या ठिकाणी चार वाजता पाहता येणार निकाल:
https://hscresult.net
11admission.org.in
https://msbshse.co.in
maharesult.nic.in
hscresult.mkcl.org

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here