मोहोळच्या क्वारंटाईन सेंटरमधील होमगार्ड अन्‌ महसूल कर्मचाऱ्यांचा आराम !

ताज्या घडामोडी सोलापूर

…अखेर जेवण ठेकेदाराचा ठेका केला रद्द,सेंटरमध्ये गडबड गोंधळ
मोहोळ (तालुका प्रतिनिधी) : मोहोळ शहरात करण्यात आलेल्या क्कारंटाईन सेंटरमध्ये अनागोंदी कारभार असल्याचे उघडकीस आणल्यानंतर जेवण देणाऱ्या ठेकेदाराचा ठेका बंद करण्यात आल्याचे बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले.मात्र त्या सेंटरची ज्याच्याकडे जबाबदारी ज्यांच्याकडे होती असे होमगार्ड, महसूलचे अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही. यांना तहसीलदार वब पोलीस अधिकारी हे पाठीशी घालत असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. काम सोडून सेंटरमध्ये झोपा मारणारे व सेंटर सोडून इकडे तिकडे भरकटणारे यांच्यावर काय कारवाई करणार अशा प्रश्‍न उपस्थील केला जात आहे.

सकाळी आळ्या निघाल्याने रात्रीच्या वेळी कोणीच सरकारी जेवण केले नसल्याचे सांगण्यात आले.याबाबत अधिक माहिती अशी की, गरड महाविद्यालय येथे असलेले क्वारंटाईन सेंटर असून अडचण नसून खोळांबा असाच प्रकार सुरू असल्याचे आळ्या व इतर घटनेवरून उघडकीसआले होते.ज्या दिवशी सकाळी जेवणामध्ये आळ्या निघाल्या होत्या त्या दिवशी रात्री कोणीच जेवण केले नाही. फक्त शहरात असणाऱ्यांनी घरातून डबा मागविला मात्र ग्रामीण भागातीलनागरीकांनी जेवण न करताच रात्र काढल्याचे सांगण्यात आले.

जेवणामध्ये आळ्या निघाल्याचे वृतपत्रात बातमी प्रसिध्द झाल्यानंतर मोहोळ येथील प्रशासन कामाला लागले. सार्वजणीकबांधकाम विभागाकडून जेवण पुरवणाऱ्या ठेकेदाराची नियुक्‍ती करण्यात आली होती.त्याचा ठेकाच रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले.आता तालुक्‍यातील दुसऱ्या क्वारंटाईन सेंटरलाजेवण पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराकडे काम देण्यात आल्याचे सांगण्यात आले.सेंटरमध्ये क्‍्वारंटाईन करण्यात आलेले सेंटरच्या बाहेर येवू नये यासाठी होमगार्ड, कोतवाल याचबरोबर महसूल व इतर विभागातील अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र तेत्यांच काम सोडून क्वारंटाईन सेंटरमधील खोलीमध्ये आराम करत असल्याचे दिसून आले. सेंटरच्या दरवाज्यामध्ये बाहेर कोणीच नसल्याने क्‍्वारंटाईन केलेले लोक इमारतीच्या आत बाहेरकरत असल्याचे सांगण्यात आले.

ड्युटी सोडून भलतेच उद्धोग करणाऱ्या अधिकारी,कर्मचारी यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन काद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे.या सर्व गभीर घटनेकडे तालुक्‍याचे प्रमुख तहसीलदार यांनी या प्रकरणाची संबधीताची जबाबदारी निश्चीत करून त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत महसूल विभाग व संबधीत विभागालाशिफारश करण्याची गरज आहे. अन्यता या प्रकरणाकडे वेगळ्या नजरेने पाहिले जाण्याचा धोका असल्याची चर्चा मोहोळ शहर त्याचबरोबर जिल्ह्याज चर्चा सुरू झाली आहे.

आता तहसीलदारबनसोडे कोणती भुमीका घेतात याकडे सर्वाच लक्ष लागल आहे.मोहोळ येथील गंभीर प्रकरणाची जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालून दोषीवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

……………………………………………………………………….

आपत्ती व्यवस्थापन कायद्याखाली गुन्हे दाखल करा


कामात हायगय,लोकाच्या जिवाशी खेळणाऱ्यावर आपत्ती व्यवस्थान कायद्याखाली गुन्हे दाखल करण्याची मागणी केली जात आहे.प्रशास –
नानं कडक धोरण नाही घेतल्यास आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा दैनिक जनसत्य शी बोलताना नागरीकांनी दिला आहे.दरम्यान कोटेशन
पध्दतीने जेवण पुरवण्याचा देण्यात आलेला ठेका रद्द करण्यात आल्याचे बांधकाम विभागाचे अभियंता गणेश क्षिरसागर यांनी पत्रकाराशी
बोलताना सांगितले.

……………………………………………………………………………………………..
पोलीस बंदोबस्त नेमा

क्वारंटाईन सेंटरला होमगार्डच्या जिवावर ठेवणे धोक्याचे असल्याचे दिसून आले आहे. यासाठी त्या ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक
करण्याची गरज आहे.कर्मचारी असल्याने कोणीही नागरीक आत बाहेर करणार नाही. क्वारंटाईन केल्याचा प्रशासनाचा उद्देश सफल होईल
यासाठी तहसीलदार बनसोडे व पोलीस निरीक्षक कोकणे यांनी लक्ष घालण्याची गरज आहे.अन्यता मागचे पाठ पुढचे सफाट या मनीप्रमाणे
प्रकार होईल असेच दिसते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *