पत्नीनेच प्रियकर व मुलांच्या मदतीने काढला पतिचा काटा

क्राईम सोलापूर

*संजय काळे खुन प्रकरणाला वेगळे वळण..

पत्नीस अटक तीन ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी
 टेंभुर्णी ( प्रतिनिधी ) 
:   टेंभुर्णी जवळ असलेल्या शिराळ (टें ) ता.माढा  येथील संजय मारुती काळे, [वय 55] याचा खून करून टेंभुर्णी अकलूज रोड वर असलेल्या शेवरे  ता. माढा येथील डाव्या कालव्याच्या बाजूला खून करून अर्धवट जाळून छोटा हत्ती डीझेल टाकून पेटवून  पुरावा  नष्ट करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी टेंभुर्णी पोलिसांनी मयताचा मुलगा   1) आकाश संजय काळे (वय 20 ) रा.शिराळ ता.माढा,  ‘2)  लक्ष्मण रघुनाथ बंद पट्टे  (वय  27 )  3) अल्लाउद्दीन उर्फ आलम बासू मुलानी  दोघे राहणार सुर्ली ता. माढा यांना टेंभुर्णी पोलीसांनी  तपासाची चक्रे फिरऊण अवघ्या 48 तासात दि .28 रोजी  अटक करून माढा न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना तीन ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली होती दरम्यान  मयत संजय काळे यांची पत्नी  अंजना संजय काळे हिला टेंभुर्णी पोलिसांनी ताब्यात घेऊन कसुन चौकशी केली आसता आंजना काळे यांनी धक्का दायक कबुली दिली त्या मध्ये तीने प्रियकर आलम मुलाणी व त्याचा सहकारी लक्ष्मण बंदपट्टे  यांना  दहा हजाराची सुपारी देऊन पोटचा मुलगा आकाश काळे याला वडीलाच्या बाबत भडकऊन मुलांच्या मदतीने पतिची कटरचुन निर्घुनपने हत्या केल्याचे पोलिस तपासात   निष्पन्न झाले आसल्याचे टेंभुर्णी पो.नि. राजकुमार केंद्रे यांनी आज पत्रकार परीषदेत माहीती दिली सदर आरोपी अंजना काळेला आज माढा न्यायालयासमोर उभे केले असता दिनांक 03/08 2020 पर्यंत [तीन ऑगस्ट पर्यंत] पोलीस कोठडी दिली असून वरील घटनेचा तपास करमाळा विभागीय अधिकारी डॉक्टर विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे तपास करीत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *