भांडण सोडवण्यासाठी जाणं आलं अंगाशी, वीटनं हल्ला करत केली हत्या

0
23

नागपूर: राज्याची राजधानी नागपूरमध्येएक धक्कादायक घटना घडली आहे. भांडण सोडवायला गेलेल्या एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. या घटनेनं नागपूर चांगलंचं हादरलं आहे. बुधवारी ही हत्या झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दोघांमध्ये सुरु असलेलं भांडण सोडवायला गेलेल्या एका तरुणाची हत्या केली आहे. ज्या दोघांमध्ये भांडण सुरु होतं. त्यापैकी एकानं हे कृत्य केलं आहे.समोर आलेल्या माहितीनुसार, प्रवीण कथाने असं मृत तरुणाचं नाव आहे. मृत हा परसोडी येथील राहणारा होता. तर आरोपी आशिष सुरेश हा स्थानिक नागरिक आहे.  आशिष हा बांधकाम कामगार आहे. आशिषनं साहिल धमके  याच्याकडे आपल्या कामाचे पैसे मागितले. मात्र यावेळी आशिष आणि साहिल यांच्यात वाद झाला.

आशिष आणि साहिल यांच्यात कामाच्या पैशांवरुन वाद झाला. याचवेळी प्रवीण दोघांमधील वाद सोडवण्यास गेला होता. प्रवीण भांडण सोडवण्यासाठी आल्यानं आशिष याला राग आला. रागाच्या भरात आरोपी आशिषनं प्रवीणवर वीट हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला प्रवीणचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून आरोपी आशिषला अटक करण्यात आली आहे.

‘फ्रेंडशिप डे’ दिवशी 6 जणांनी जीवलग मित्राचा केला गेम

‘फ्रेंडशिप डे’च्या  दिवशी झालेल्या वादातून 6 जणांनी आपल्या जीवलग मित्राची निर्घृण हत्या केली. ‘फ्रेंडशिप डे’च्या दिवशी किरकोळ कारणातून झालेल्या वादानंतर, आरोपींनी काल रात्री नियोजनपूर्व पद्धतीनं काटा काढला. आरोपींनी नागपूरातील हिवरी नगर भागात तरुणाला बोलवून त्याच्यावर घातक हल्ला  केला. यानंतर आरोपींनी दुखापत झाल्याचं बनाव रचत त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. पण तत्पूर्वी त्याची प्राणज्योत मालवली होती.अनिकेत भोतमांगे असं हत्या झालेल्या 21 वर्षीय तरुणाचं नाव असून तो विंडो फ्रेमिंगचं काम करायचा. दरम्यान फ्रेंडशिप डेच्या दिवशी अनिकेतचा त्याच्या अन्य सहा मित्रांसोसबत किरकोळ कारणातून वाद झाला होता. या झालेल्या वादाचा राग मनात धरून संबंधित सहा मित्रांनी अनिकेतच्या हत्येचा कट रचला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here