बेंबळे येथे शौचालय बांधण्याचा कारणावरून दोन गटात हाणामारी

क्राईम सोलापूर

टेंभुर्णी  : बेंबळे ता. माढा येथे सार्वजनिक जागेत शौचालय बांधण्याचा कारणावरून दोन गटात हाणामारी झाली असून यात दोन्ही गटातील माजी सरपंच कैलास भोसले यांच्यासह पाच जण जखमी झाले आहेत. भोसले यांच्यावर अकलूज येथील खासगी रूग्णालयात उपचार चालू आहेत. दोन्ही गटातील २२ जणांवर एकमेकांचा विरोधात टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हे  दाखल करण्यात आले आहेत. ही घटना दि. २३ रोजी सकाळी ११ वाजण्याचा सुमारास घडली.

बेंबळे ता. माढा येथील ज्योतिबा देवस्थान ट्रस्टचे ज्योतिबा मंदिर असून त्याठिकाणी तालीम आहे. तालमीतील पैहलवानांसाठी मागील तीन महिन्यापूर्वी ग्रामपंचायतीला शौचालय बांधण्यास मंजुरी आली होती. ग्रामपंचायतीने यासाठी खड्डा घेतला होता. तालमीमधील काही भाग ज्योतिबा देवस्थानचा हद्दीत येत असल्याने याठिकाणी शौचालय बांधू नये यासाठी माढा न्यायालयात दिवाणी दावा दाखल केला आहे. ग्रामपंचायतीने या ठिकाणी शौचालयसाठी खड्डा घेतला. यावरून गावात दोन गट पडले होते. गुरुवार दि. २३ रोजी सकाळी कुर्डूवाडी पंचायत समितीचे वरीष्ठ अधिकारी व टेंभुर्णी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पहाणी करण्यासाठी येणार होते. दोन्ही गट आमनेसामने आले होते. एकमेकांची बाचाबाची होऊन मंदिराच्या आवारात काठ्या, लोखंडी रॉड, तलवारी, कु-हाड, कोयते, खोरे, दांडे या हत्यारांनी एकमेकांना मारहाण करण्यास सुरूवात करण्यात आली. तात्काळ पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे बेंबळे येथे दाखल झाल्याने त्यांनी लाठीचार्ज करून नागरिकांना पांगवले. जखमी मध्ये कैलास भोसले, उत्तम काळे, सदाशिव भोसले, जोतिराम नागटिळक व प्रवीण मिस्कीन यांचा समावेश आहे. सोमनाथ नागटिळक यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार पप्पू काळे, बबलू काळे, नागनाथ भोजने, सोमनाथ भोजने, उत्तम काळे, कैलास भोसले, दादासाहेब भोसले, विजय पवार, अतुल अनपट, बळी भोजने, औदुंबर लोंढे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. दुसऱ्या गटातील कैलास भोसले यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार एकनाथ भोसले, सदाशिव भोसले, सहदेव पवार, बापू भोसले, आदिनाथ हुंबे, नवनाथ हुंबे, रोहित वांगधरे, आबा गणगे, संदीप कदम, किशोर कदम, सोमनाथ नागटिळक यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. अशा दोन्ही गटातील २२ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *