मोहोळ : जहीर खरादी याच्यावर तलवार, चाकू व लोखंडी गजाने बेदम मारहाण

0
324
जनसत्य प्रतिनिधी
मोहोळ : आमच्या विरोधकांबरोबर का फिरतोस, असा दम देत  ११ जणांनी येथील मोहोळ येथील जहीर खरादी याच्यावर तलवार, चाकू व लोखंडी गजाने बेदम मारहाण केल्या प्रकरणी ११ जनांवर जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची घटना दि. १७ ऑगस्ट रोजी रात्री साडेआठ वाजनेच्या सुमारास शहरातील कुरुल रोड परिसरात फाटे मंगल कार्यालयाच्या जवळ घडली.
याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, मोहोळ शहरातील सद्दाम कुरेशी व नजीम कुरेशी यांची व बुधवार पेठेतील कुरेशी मोहल्ल्यातील काही तरुणांची जुनी भांडणे आहेत. ज्याच्यांबरोबर आमची भांडणे आहेत त्यांच्यासोबत तु का फिरतोस असे म्हणत जहीर खरादी हे १७ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेआठ वाजण्याच्या दरम्यान  कुरुल रस्त्यावरील  त्यांची पान टपरी बंद करून घराकडे निघाले असता अचानक मंजुर कुरेशी, शहादाब कुरेशी, गौस कुरेशी, तौफीक कुरेशी, नयुम कुरेशी, अनिस कुरेशी, नुर कुरेशी, रिजवान कुरेशी, शोएब कुरेशी, अजिम कुरेशी, महमंद कुरेशी (सर्व रा. बुधवार पेठ मोहोळ) यानी हातात तलवार, चाकू व लोखंडी रॉड घेऊन तेथे येवुन झहीर खरादी यांच्या वर प्राणघातक हल्ला करुन त्याला गंभीर जखमी केल्याची फिर्याद झहीर इक्बाल खरादी (वय- ३२ रा. बागवान नगर मोहोळ) यांनी दिली असुन वरील ११ जनांच्या विरोधात जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असुन या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक संतोष माने हे करीत आहेत. घटनेनंतर संशयीत आरोपी फरार झाले असून पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here