घरी जाताना तरुणास मारहाण ; तिघांवर गुन्हा

0
57
सोलापूर : मित्रांसोबत दुचाकीवरून घरी जात असताना तीन जणांनी मिळून एका तरुणाला बघून घेण्याची धमकी देत शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना दि.९ ऑगस्ट रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास काडादी चाळ,सोलापूर येथे घडली.याबाबत प्रथमेश शंकर क्यार (वय-१९, रा.रेल्वे स्टेशन काडादी चाळ,सोलापुर) यांनी फिर्याद दिली आहे.त्याच्या फिर्यादीवरून बसवराज श्रीशैल तुप्पद,नागराज श्रीशैल तुप्पद व त्याच्या सोबत असलेला मित्र यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    याबाबत अधिक माहिती अशी की,फिर्यादी प्रथमेश हे सोमवारी सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास मित्रासोबत कडादी चाळ ते पोलीस मुख्यालयाकडे जात असताना संशयित आरोपी बसवराज श्रीशैल तुप्पद,नागराज श्रीशैल तुप्पद व त्याच्या सोबत असलेला मित्र,प्रथमेश यांच्या मोटरसायकलला आडवून शिवीगाळ करत तुला बघतोच अशी धमकी दिली.तसेच मोटरसायकलवर बळजबरीने बसवुन जुनी मिल कंपाऊंड यामागील मैदानात नेले.तेथेही शिवीगाळ करत असताना त्यांच्या तावडीतून प्रथमेश हा सुटून आला.अशा आशयाची फिर्याद प्रथमेश यांनी दिली आहे.या घटनेची नोंद जेलरोड पोलिस ठाण्यात झाली असून,या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक शेख हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here