तुझे हम खल्लास करणे आये है असे म्हणून तरुणाच्या डोक्यात घातला लोखंडी रॉड ; दहा जणांवर गुन्हा

क्राईम सोलापूर


सोलापूर (प्रतिनिधी) : गुरुनानक चौकातील कुर्बान हुसेन नगरात घरगुती झालेल्या वादावरून एका जणास तुझे हम खल्लास करणे आये है असे म्हणून डोक्यात लोखंडी रॉड घातल्याची घटना दि. ९ ऑगस्ट रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली.रहीम कय्युम सातखेड,आक्रम कय्युम सातखेड,फैजल सालार,मोसिन सालार,टिपू सालार,जसिम गफुर शेख व इतर चार जण रा.मुल्लाबाबा टेकडी,विजापूर वेस,सोलापूर असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.याबाबत अधिक माहिती अशी की,फिर्यादी मुद्यसर जैनुद्दीन शेख (वय-३२) रा.कुर्बान हुसेन नगर,गुरूनानक चौक,सोलापूर याच्या घराशेजारी राहणारे अलीम सैफनसाब सातखेड, (वय-६७) रा.कुर्बान हुसेन नगर यांना त्यांच्या घरगुती वादावरून दहा जणांनी मिळून शिवीगाळ करून तुझे हम खल्लास करणे आये है असे म्हणून धक्काबुक्की केली.हे पाहून फिर्यादी आरोपींना मनाला की,आलिम सातखेड हे वयस्कर आहे.त्यांना कशासाठी धक्काबुक्की करता असे समजून सांगत असताना फिर्यादीला तेरा क्या संबंध है तू क्यू बीच मे आ रहा है हमारा फॅमिली मॅटर बहुत दिन से चालू है.तू कोण बीच मे आने वाला हम तुझेही खल्लास करेंगे असे म्हणून शिवीगाळ करून फिर्यादीस लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.व मोसिन सालार याने त्याच्या हातातील लोखंडी रॉड फिर्यादीच्या डोक्यात मारून गंभीर जखमी केले.व जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.असे फिर्यादीत म्हटले आहे.या घटनेची नोंद सदर बाजार पोलिस ठाण्यात झाली असून,दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेचा पुढील तपास सपोनि.साळुंखे हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *