जनसत्य, प्रतिनिधी
मोहोळ,
मोहोळ येथे दोन वेगवेगळ्या कारणावरून दोन गटात मारामारी झाल्याची घटना दि. २५ फेब्रुवारी रोजी मोहोळ येथील गुलशन नगर येथे घडली असून मोहोळ पोलिसांनी दोन्ही गटातील अकरा जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अब्दुल रज्जाक कुरेशी हे भावकीतील मुलीचे लग्न करून गुलशन नगर येथील भावाच्या घरी जाऊन बोलत बसले असताना काही व्यक्तींनी घरात प्रवेश करून कारण नसताना शिवीगाळी करून डोक्याला काठीने मारहाण करून छातीला दगड मारून मारहाण केल्याप्रकरणी शाहिद सादीक कुरेशी, नजीम रफिक कुरेशी, रफिक गुलामद्दीन कुरेशी, शहाबाज अबू कुरेशी, आवेज रफिक शेख, व शाबाद रफिक कुरेशी या सहा जनानी मारहान केल्याची फिर्याद अब्दुल रज्जाक कुरेशी यांनी दिली असुन वरिल सहा जनाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान परस्पर विरोधी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. दि २५ फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजताच्या दरम्यान नजीम रफिक कुरेशी हे कुरेशी गल्लीतील मस्जिद मध्ये नमाज पडून बाहेर आले असता रजाक फकीर कुरेशी यास दिलेल्या जनावरांचे पैसे मागितले असता तो शिवीगाळ करून निघून गेला. मात्र काही वेळातच काही लोकांना घेऊन घरासमोर मोटरसायकलवर येऊन घरात घुसून तुझे कसले पैसे म्हणून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून घरातील कपाटाची मोडतोड केली म्हणून त्यांनी रजाक फकिर कुरेशी, इब्राहिम फकीर कुरेशी, सद्दाम रज्जाक कुरेशी, गौस फकीर कुरेशी व नजीर गौस कुरेशी रा. गुलशन नगर मोहोळ या पाच जणांविरुद्ध फिर्याद नाजीम रफिक कुरेशी यांनी दिली असुन वरिल दोन्ही गटाच्या ११ जनांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असुन पुढील तपास महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल मालती नागरे हे करीत आहेत.