सैन्यात मेजर असल्याचा बनाव करून लग्नाचं आमिष, 17 कुटुंबीयांकडून लुटले करोडो रुपये

ताज्या घडामोडी

नवी दिल्ली : लग्नाचं आमिष दाखवून एक दोन नाही तर तब्बल 17 कुटुंबीयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्वत:ला सैन्य दलातील मोठ्या हुद्द्यावरचा अधिकारी असल्याचं सांगून या व्यक्तीनं 17 कुटुंबीयांमधील मुलींना लग्नाचं आमिष दाखवून तब्बल साडे 6 कोटी रुपये लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

हैदराबादमध्ये काही शे माणसांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे सर्वचजण चकित झाले. सैन्य दलातील अधिकारी असल्याचा दावा करत या व्यक्तीनं 17 कुटुंबीयांना फसवलं. त्याने आतापर्यंत साडे सहा कोटी रुपये लुटल्याची माहिती मिळाली आहे. बनाावट आणि तोतया सैन्य दलाच्या या अधिकाऱ्याला पोलिसांनी तातडीनं बेड्या ठोकल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार आरोपीचं नाव मधुवथ श्रीनु नायक उर्फ श्रीनिवास चौहान असं आहे. आंध्र प्रदेशातील प्रकाशम जिल्ह्यातील लमपल्ली गावाचा हा रहिवासी आहे. या महाठगासला बेड्या ठोकल्यानंतर सैनिकपुरी इथे एक दुकान तीन गाड्या आणि ऐशोआरामाचं जीवन जगत असल्याचं पोलिसांना समजलं. पोलिसांनी या महाठगाकडून तीन नकली पिस्तूल, सैन्य दलाची वर्दी आणि बनावट आर्मीचं आयकार्ड जप्त केलं आहे. त्यासोबतच कार आणि 85 हजार रुपयांची रोख रक्कम देखील ताब्यात घेतली.

पोलिसांनी दिेलेल्या माहितीनुसार मधुवुथ 9 वी पास आहे. त्याने पोस्ट ग्रॅज्युएशन केल्याचं बनावट सर्टिफिकेट तयार करून घेतलं होतं. त्याला एक मुलगा आणि पत्नी असा परिवार आहे. त्याची पत्नी आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यात राहाते. आपल्याला सैन्यात नोकरी मिळाल्याची खोटी माहिती त्यानं कुटुंबियांना देखील दिली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *