जामगांवच्या गावकारभार्‍याबाबत नेटकर्‍याकडून जागृती; कारभारी विकास अन् सलोख निर्माण करणारा असावा !

ताज्या घडामोडी सोलापूर

कारभारी विकास अन् सलोख निर्माण करणारा असावा !सोलापूर / प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यात ग्रामपंचायतीचे धुमशान सुरू असल्याने ऐन थंडीत गावोगावचे राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. ग्रामपंचायतीच्या नवीन बॉडीत सदस्य, पॅनेलप्रमुख कसे असावेत याबाबत गावातील प्रमुख मंडळीत चर्चांना ऊत आला आहे. विशेष:म्हणजे सोशल मीडियावर याबाबत नेटकर्‍याकडून मोहोळ तालुक्यातील जामगांव बुद्रूक येथील निवडणूकीबाबत प्रबोधन सुरू आहे. गावच्या विकासाला प्राधान्य देणारा व सलोखा निर्माण करणारे नेतृत्व असावे असा सूर निघू लागला आहे.
………….
सर्वांना सामावून घेण्याची इच्छाशक्ती असावी…
सरपंच व सदस्यांबाबत सोशल मीडियावर जोरदार जागृती सुरू आहे. ग्रामपंचायतीवर जाण्यासाठी इच्छुक असणारा जबाबदार व गावासाठी झटणारा असला पाहिजे. प्रशासनावर वचक असणारे नेतृत्व असावे. विधायक भूमिकेतून कार्यरत असणारा, व्यक्तीमत्वावर कोणताही डाग नसणारा असा सर्वसमावेशक सदस्य अथवा सरपंच असावा. सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सदस्या, पॅनेलप्रमुख यांच्यामध्ये सर्वांना सामावून घेवून काम करण्याची इच्छाशक्ती असावी. तरच अशा लोकांना संधी द्यावी, असा सूर निघत आहे.
…………………………………
कशी असावी ग्रामपंचायतीची बॉडी…
सोशल मीडियावरही ग्रामपंचायतीचा सदस्य व पॅनेलप्रमुख कसा असावा यावरून जनजागृती सुरू आहे. गावच्या विकासासाठी आलेला 14 व 15 व्या वित्त आयोगाचा निधी सर्व मिळून सरपंच, ग्रामसेवक आणि स्वयंघोषित लोकल नेते आदी जण वाटून खाणारे नसावेत. जर गावात भांडणे झाली तर ती मिटवणारा असावा. शासनाच्या विविध योजना लाभार्थ्यांना फसवून पैसे उकळून पुन्हा वाटून खाणारा नसावा.गावातील गरीबांना अडचणीच्या काळात निस्वार्थी भावनेने मदत करणारा असावा. गावात मंजूर झालेल्या विविध सरकारी योजनांची कामे अर्धवट करुन पूर्ण बिल उचलणारा नसावा.
……………………..
‘हे’ लक्षात ठेवा…
गावात सर्वच पदे आपल्याच घरात ठेवणारा नसावा. भावाला एक पद, बायकोला एक पद, मुलीला, स्वत:ला अनेक पदे आणि सगळं मलाच पाहिजे, अशी भावना असणारी नेतेमंडळी नसावी. सरपंच हा गावातील वॉर्डातील घनकचरा, गटारे, रस्ते, पाणीपुरवठा यांचे नियोजन करुन स्वच्छता ठेवणारा आणि प्रशासनावर वचक ठेवणारा असावा. दारू पिऊन धाब्यावर बसून गावाच्या विकासाच्या चर्चा करणारा नसावा. कायम वर वर गोड गोड गप्पा मारून हात हलवून फसवणारे सदस्य, सरपंच अजिबात नसावा. जवळच्या व्यक्तींची कामे करणारा नसावा सर्व समाजातील लोकांची कामे करणारा असावा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *