धक्कादायक! सुशांत सिंह राजपूतच्या भावासह आणखी एकाला भर चौकात घातल्या गोळ्या

इतर ताज्या घडामोडी देशविदेश

सहरसा : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने याने काही दिवसांपूर्वी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या (Suicide) केले होती. यामुळे संपूर्ण देश हळहळला होता. आता सुशांत सिंह राजपूतच्या कुटुंबीयांबाबत एक दुःखद बातमी समोर आली आहे. सुशांत सिंह राजपूतचा मावस भाऊ राजकुमार सिंह आणि त्याच्या एका सहकाऱ्यांवर अज्ञात मारेकऱ्यांनी गोळ्या झाडल्या आहेत. या हल्ल्यात दोघंही गंभीर जखमी झाले असून त्यांचा सहकारी अली हसन याची प्रकृती चिंताजनक आहे. सुशांत सिह राजपूतचा मावस भाऊ राजकुमार सिंह हा यामाहा मोटारसायकल शोरूमचा मालक आहे. बिहारमधील सहरसा, सुपौल आणि मधेपूरा या तीन जिल्ह्यात त्याचं यामाहा मोटारसायकल शोरुम्स आहेत. ते दररोज मधेपूरा येथील शोरूम उघडण्यासाठी जात असायचे. आजही ते मधेपूरा येथे शोरूम उघडण्यासाठी जात होते. दरम्यान त्यांच्यावर गोळीबार झाला आहे. या हल्ल्यात राजकुमार सहीत त्यांचा सहकारी गंभीर जखमी झाला आहे. यामध्ये सहकारी अली हसनची प्रकृती चिंताजनक आहे.राजकुमार सिंह दररोजप्रमाणे आज मधेपूरा येथे शोरूम उघडण्यासाठी जात होते. यावेळी ते बैजनाथपूर चौकातून जात असताना, पाठीमागून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांना गाडीला ओव्हर टेक करत गोळीबार केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सुशांत सिंह राजपूतचा मावस भाऊ राजकुमार सिंह आणि त्याच्या सहकाऱ्याला स्थानिक रुग्णालयात दाखल केलं आहे. उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं की, दोघांतील एकाची प्रकृती चिंताजनक आहे.या दोघांवर मारेकऱ्यांनी जीवघेणा हल्ला का केला, याचे कारण अद्याप समोर आलेलं नाही. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलीस विविध पुरावे शोधण्याचा काम करत आहेत. तसेच आसपास सीसीटीव्ही कॅमेऱ्यात काही टिपलं गेलं आहे का? याचा तपासही करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *