गिरीश महाजन यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल, भाजपच्या गोटात खळबळ

ताज्या घडामोडी पुणे

पुणे  :  जळगाव विद्या प्रसारक मंडळाच्या संचालकाला डांबून ठेवल्या प्रकरणी  भाजप नेते आणि माजी महसूल मंत्री गिरीश महाजन यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  महाजन यांच्यासह 28 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.जानेवारी 2018 ते 2021 या दरम्यान ही घटना घडली होती.  जळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारक सहकारी समाज मर्यादित संस्थेच्या एका संचालकाचे अपहरण करून  पुण्यातील सदाशिव पेठेतील एका फ्लॅटमध्ये डांबून ठेवण्यात आले होते. यावेळी त्यांच्या गळ्याला चाकू लावून राजीनामे देण्यासाठी दबाव आणला होता. तसंच खंडणी स्वरूपात 5 लाख उकळण्यात आले होते. हा प्रकार इथेच थांबला नाही, जळगावला जाऊन संस्थेची तोडफोड देखील करण्यात आली.

या प्रकरणी पुण्यातील कोथरुड पोलीस ठाण्यात तानाजी भोईटे, निलेश भोईटे, वीरेंद्र भोईटे यांच्यासह 28 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विजय पाटील (वय 52) यांनी फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे जळगाव येथील असून, ते वकील आहेत. तर ते जळगाव येथील मराठा विद्याप्रसारक सहकारी समाज मर्यादित संस्था जळगावचे संचालक आहेत. दरम्यान त्यांना आरोपींनी पुण्यात संस्थेचे कागदपत्रे देण्याच्या बहाण्याने बोलावून घेतले. ते पुण्यात आल्यानंतर त्यांना शिवीगाळ करत दमदाटी करण्यास सुरुवात केली. तसंच त्यांना गाडीत जबरदस्तीने बसवत सदाशिव पेठेत असलेल्या एका फ्लॅटवर नेले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *